शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 12:17 PM

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी केली कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी, अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा लूक बदलणार

कोल्हापूर : मंजूर होऊनही रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या कामासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या मार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी शुक्रवारी (दि. ५) दिली. लल्लन हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी करीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला २०१६-१७ मध्ये तत्कालीन रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. १०७ किलोमीटरच्या या मार्गाचे याआधीही सर्वेक्षण झाले आहे; मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी घाट असल्याने उतार जास्त आहेत. हे उतार कमी करण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे लल्लन यांनी सांगितले. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, स्वप्नील नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओस्वाल उपस्थित होते.

रेल्वेस्थानकाचा लूक बदलणार

अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वेस्थानकाचाही लूक बदलण्यात येणार आहे. यामध्ये स्थानकवर अत्याधुनिक पद्धतीचा १२ मीटर लांबीचा ब्रीज उभारण्यात येणार आहे. तीन ठिकाणी एक्सलेटर लिफ्ट, आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहे, फर्निचर, चार नंबर फलाटावर शेड उभारण्यात येणार आहे. एका वर्षात ही कामे पूर्ण करायची आहेत. यासाठी स्थानकावरील कोणत्या ठिकाणी कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, याची माहितीही लल्लन यांनी घेतली.

पादचारी पूलही होणार

परीख पुलाच्या अलीकडील मार्ग बंद केल्याने राजारामपुरीतून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणाऱ्या नागरिकांना धोकादायक परीख पुलाखालूनच यावे लागते. यासाठी येथे पादचारी पूल उभारण्याबाबतही रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे