शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

कोल्हापूर : उदगांवात दिवा काढणी, भव्य पिशे मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:51 PM

उदगांव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेला सोमवापासून सुरवात झाली. सोमवारी रात्री दिवा काढणी तर आज मंगळवारी सकाळी पिशे व अग्निप्रवेश करण्यात आला. तर सायकांळी मोठया उत्साहात श्री जोगेशवरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे उदगांवात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. तर यात्रेच्या निमित्ताने पाळणे व दुकाने मोठया प्रमाणात दाखल झाल्याने लाखो रुपयाची उलाढात होत आहे.

ठळक मुद्दे उदगांवात दिवा काढणी, भव्य पिशे मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम हजारो भाविकांची उपस्थिती, लाखो रुपयाची उलाढाल

उदगांव : उदगांव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेला सोमवापासून सुरवात झाली. सोमवारी रात्री दिवा काढणी तर आज मंगळवारी सकाळी पिशे व अग्निप्रवेश करण्यात आला.

सायकांळी मोठया उत्साहात श्री जोगेशवरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे उदगांवात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. तर यात्रेच्या निमित्ताने पाळणे व दुकाने मोठया प्रमाणात दाखल झाल्याने लाखो रुपयाची उलाढात होत आहे.सोमवारी रात्री सव्वा बाराच्या जोगणी होणा-या कुंभाराच्या हाताने जोगेश्वरी मंदिरातुन मडके घेवून जोंधळयाचा चौक त्यापुढे असलेल्या आडशेर लाथाडून न बोलता सर्वजण कलेश्वर मंदिरासमोर असलेल्या चेबरमधील पणती काढुन ती जोगेश्वरी मंदिरात मडक्यातुन आणण्यात आली. व दिवा काढणी कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर आज सोमवारी सकाळी बाराबलूतेदारातील सात लोक पिशे झाले होते. यावेळी त्याच्या उजव्या हातात लिंबाचे तर डाव्या हातात बांबळीचा शिरा, डोक्याला व कबरेंला लिंबाचे डाहाळे, कबरेला चाळ बांधुन गावातील प्रत्येकांच्या उब-यांवरील असलेले गुळ व खोबरे गोळा करण्यात आला. त्यानंतर मारुती मंदिराजवळ असलेल्या वेशीजवळ सर्व पिशे एकत्रित आल्यानंतर अकराच्या सुमारास अग्निप्रवेश करण्यात आला.सायकांळी सात वाजता श्री जोगेश्वरीची भव्यं मिरवणूक काढण्यात आली. यात शेर शेरणी कराडरच्यानं, कोल्हापूरच्यांन, महापूरच्यानं सत्यं जागेणी सभा मिळाली उदं भलं उदं .. च्या गजरात फटक्याची आतिषबाजी करत पारंपारीक वादयाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यांनतर मिरवणुक जुन्या हारीजनवाडयातील थळोबा मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर मिरवणूक पुन्हा मंदिरात नेण्यात आली.

दिवसभरात रीर्व्हस रीक्षा, रेकॉर्ड डॉन्सं स्पर्धा पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. तर यात्रेनिमित्तं उदगांव येथे मोठया प्रमाणात आंबे खरेदी करण्यासाठी नागरीकांनी झुबंड उडवली होती. यामध्ये लाखो रुपयाची उलाढाल झाली आहे. तसेच रात्री विविध मंनोरजन कार्यक्रम पार पडले.मुकुट व कुस्ती बुधवारी  बुधवारी सकाळी सहा वाजेल्यापासून जोगेश्वरी यात्रेच्या वैशिष्टं असलेला मुकूट मिरवणूक खेळ होणार आहे. यामध्ये एक नर व दोन मादी असे मुकूट असतात. ते डोक्यावर मुकूट व हातात वेताची काठी घेवून समोर पळणार संवगडी असा हा खेळ पाहण्यासाठी मोठया संख्येने भाविक दाखल झाले आहेत. तर सायकांळी चार वाजता डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगांव टेक्नीकल हायस्कुलच्या पटागंणात जंगी कुस्त्याचे मैदान होणार आहेत. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर