कोल्हापूर : वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्रा. दिलीप जगतापांची नाटके वारणेत सादर होणे हे अभिमानास्पद आहे व त्यादृष्टीने हा महोत्सव एक ऐतिहासिक घटना आहे, असे मत सचिव नीलेश आवटी यांनी व्यक्त केले. वारणा नाट्यमहोत्सवाची प्रेरणा ही तरुणपिढीला, शाळा-कॉलेजमध्ये नाट्यकला सादर करण्यास प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अध्यक्ष रमेश हराळे यांनी व्यक्त केला.यावेळी स्नेहल कुलकर्णी, विकास मिनेकर (दलदल) प्रणिता भिंताडे व धनंजय माने (बें बें बकरी) यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. अकादमी भविष्यात नाट्यमहोत्सव, चित्रपट महोत्सव भरविणार असल्याची माहिती समारोपप्रसंगी उपाध्यक्षा नेहा आवटी यांनी दिली. यावेळी केदार सोनटक्के यांच्या हस्ते कामगार कल्याण मराठी नाट्य स्पर्धेमध्ये प्रकाश योजनेत द्वितीय क्रमांक (दलदल) मिळविलेल्या विनायक सुतार यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी अमित माळी, प्रमोद कोरे, प्रा. टी. बी. राठोड, अनिल यादव, तानाजी शिंदे, वर्षा हराळे, माधवी आवटी, अंबिका चौगुले, हेमलता बोरकर, लक्ष्मण द्रविड, शुभांगी तावरे, अक्षय थोरात, तेजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.