शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

कॅन्सरवरील उपचारांसाठी कोल्हापूरच भारी

By admin | Published: February 04, 2015 12:21 AM

रुग्णांना दिलासा : मुंबई, पुण्याकडील धावपळ वाचली; अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध

संतोष मिठारी - कोल्हापूर  -चाळीस वर्षांपूर्वी एखाद्याचे ‘कॅन्सर’चे निदान झाले की, त्याला कोल्हापुरातून मिरज अथवा मुंबई, पुण्याला जाण्याचा सल्ला दिला जायचा. याठिकाणी जाण्याचा सल्ला म्हणजे रुग्णाची स्थिती बिकट असल्याचे कुटुंबीय, नातेवाइकांकडून समजण्यात येत होते. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. मुंबई, पुण्यासह देशातील मोठ्या हॉस्पिटलच्या तुलनेत कॅन्सरवरील उपचारासाठी कोल्हापूर भारी ठरत आहे. रेडिएशन, केमोथेरपीसह बिनटाक्यांची शस्त्रक्रिया, आदी सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत येथील उपचारपद्धती टप्प्याटप्प्याने बदलली आहे.कोल्हापुरात साधारणत: १९९५ पासून कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाली; पण त्यानंतर त्याच्या पुढे या क्षेत्रात पाऊल पडले नाही. त्यामुळे येथील रुग्णांना मिरज, मुंबई, पुणे, आदी शहरांमध्ये उपचारांसाठी जावे लागत होते. या ठिकाणी उपचार, राहणे, आदींचा खर्च तसेच हॉस्पिटलमधील वेटिंग लिस्ट आणि व्यावसायिक वृत्तीमुळे रुग्णांचा वेळ, पैसा अधिक खर्च व्हायचा. शिवाय उपचारांना विलंब झाल्याने आजार बळावत होता. ते लक्षात घेऊन कोल्हापुरातील काही डॉक्टरांनी कॅन्सरवरील शस्त्रक्रियेसह अन्य उपचार पद्धतीची सुरुवात गेल्या दहा वर्षांपूर्वी केली. सध्या या ठिकाणी आठ कॅन्सर सर्जन असून, एक अद्ययावत कॅन्सर सेंटर कार्यरत आहे. येथे रेडिऐशन, केमोथेरपी, बिनटाक्याची शस्त्रक्रिया, ट्युमरचा अचूक अभ्यास करणारी ओंको पॅथॉलॉजी, मेजर व सुपरामेजर सर्जरीची तसेच अचूक रेडिऐशन करणाऱ्या यंत्रसामग्रीची सुविधा उपलब्ध आहे. त्याद्वारे मुंबई, पुण्यासह देशातील मोठ्या हॉस्पिटलसारखे उपचार मिळत आहेत. यामुळे रुग्णांचा वेळ, पैशांची बचत होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहे. अद्ययावत आणि बदललेली उपचार पद्धती कोल्हापूरसह सांगली, सातारा, हुबळी, आदी परिसरांतील रुग्णांना दिलासा देणारी ठरली आहे.तोंड, अन्ननलिका, स्तन, पचनसंस्था, मूत्राशय अशा सर्व प्रकारच्या कॅन्सरवर कोल्हापुरात उपचार केले जातात. मेजर सर्जरीसाठी साधारणत: ३५ ते ५० हजार, तर सुपरामेजर सर्जरीसाठी एक लाखापर्यंत उपचारांचा खर्च होतो. अन्य शहरांतील तुलनेत हा खर्च ५० टक्क्यांपर्यंत आहे. उपचारांचा खर्च याठिकाणी कमी येत असल्याने कोल्हापूरसह औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, कोकण, गोवा, कर्नाटकातील हुबळीपर्यंतचे रुग्ण येथे येतात. एकंदरीतच कोल्हापुरात आता कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार होणे शक्य आहे. ‘पेट सीटी’ ची कमतरता...कॅन्सरचा टप्पा अचूकपणे ओळखता येणारी ‘पेट सीटी होल बॉडी स्कॅन’ आणि रक्ताच्या कॅन्सरच्या स्वतंत्र विभागाची कोल्हापुरात कमतरता आहे. काही डॉक्टर, हॉस्पिटल या सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.कॅन्सरवरील उपचारपद्धतीत कोल्हापूर हे मुंबई, पुण्यासह देशातील विविध हॉस्पिटल्स्च्या बरोबरीने आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये गेल्यावर्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोल्हापूरच्या रुग्णांना कॅन्सरबाबतच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुणे आता गाठावे लागत नाही. अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात उपचारांचा खर्च कमी आहे. त्यामुळे येथे उपचारांसाठी राज्यातून रुग्ण येत आहेत.- डॉ. सूरज पवार (कॅन्सर सर्जन)