शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

कोल्हापूर : झाडाला टांगुन दिला दोन बकऱ्यांचा बळी, भानामतीचा प्रकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 6:33 PM

बहिरेश्वर, कसबा बीड ( ता करवीर ) गांवाच्या हद्दीदरम्यानच्या कुरणात उंबराच्या झाडाला दोन बकºयांना लटकावून बळी देण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. भानामतीसारख्या या प्रकारामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले . 

ठळक मुद्देझाडाला टांगुन दिला दोन बकऱ्यांचा बळी कसबा बीडदरम्यान ओढ्यावर भानामतीचा प्रकार !

कोल्हापूर/सावरवाडी : बहिरेश्वर, कसबा बीड ( ता करवीर ) गांवाच्या हद्दीदरम्यानच्या कुरणात उंबराच्या झाडाला दोन बकऱ्यांना लटकावून बळी देण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. भानामतीसारख्या या प्रकारामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले . घटनास्थानावरून प्राप्त माहिती नुसार बहिरेश्वर आणि कसबा बीड या दोन गावांच्या हद्दीमधून वाहणाऱ्या ओढ्यात गणपतराव वरुटे यांच्या विहारीनजीक  उंबराचे झाड आहे.

दोन बकऱ्यांचे मागील पाय दोरीने बांधून झाडाच्या उत्तर बाजूस वीस फुटावरील फांदीला त्यांना लटकावून बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ओढ्याशेजारी असणाऱ्या आपल्या शेतीकडे गेलेल्या माजी सरपंच सुर्यकांत दिंडे यांना परिसरात सुटलेल्या दुर्गंधीमुळे हा प्रकार निर्दशनास आला.उंबराच्या झाडाखाली लिंबू पडलेले होते. सुर्यकांत दिंडे यांनी पोलीस पाटील दतात्रय कुंभार आणि कसबा बीडचे पोलिस पाटील पंढरी ताशिलदार यांना घटनास्थळी बोलवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी घडलेला असल्याची शक्यता वर्तवली असून बकरी कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत.करवीर तालुक्यात पहिलाच प्रकार !ग्रामीण भागात अजुनही अंधश्रद्धा आहे . उंबराच्या झाडावर बकऱ्यांचा बळी देण्याचा हा प्रकार करवीर तालुक्यात प्रथमच घडला आहे.

उंबराच्या झाडावर मूक प्राण्यांचा बळी देण्याचा प्रकार हा पौर्णिमेच्या रात्री घडलेला असण्याची शक्यता आहे. भानामतीच्या असल्या प्रकारामुळे प्राण्याचा बळी जातो. विज्ञान युगात भानामतीचे प्रकार हे निंदनिय आहेत. सुर्यकांत दिंडे,माजी सरपंच, बहिरेश्वर ( ता. करवीर )

 

     

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर