भारत चव्हाण -कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या अवैध व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकरवी होणारी बेकायदेशीर मद्याची वाहतूक, तसेच पैशांचे वाटप रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तो एक भाग आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध पथके नियुक्त केली असून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर विशेष करून नाकेबंदी राहणार आहे. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता पोलीस विभागाच्या मदतीने प्रशासनाने चांगलीच हवा ‘टाईट’ करून ठेवली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत पैशांचे वाटप आणि बेकायदेशीरपणे मद्याचे वाटप होत असते. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचा अनुभव आला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन ट्रक मद्याचा साठा पकडला गेला; परंतु तो कोणी आणला होता हे शेवटपर्यंत पोलीस तपासात स्पष्ट झाले नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत बेहिशेबी पैसे असलेल्या बॅगा सापडल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत आतापासूनच प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. पोलीस, दारूबंदी व उत्पादन शुल्क, विक्रीकर, आयकर, आदी विभागांचे कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांच्या मदतीने यावेळच्या निवडणुकीतील अवैध व्यवहारांना आळा घातला जाणार आहे. त्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान चार पथकांचा अशा व्यवहारांवर वॉच राहणार आहे. निवडणूक काळात दोन राज्यांतील सीमारेषेवर नाकाबंदी असेल. त्याठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत सीमा ओलांडून आत-बाहेर करणाऱ्या प्रत्येक खासगी वाहनांची कसून तपासणी केली जाईल. उमेदवारांच्या खर्चावर सुद्धा करडी नजर ठेवण्यात आली आहे. उमेदवारांचे दैनंदिन खर्च बघण्यासाठी खास यंत्रणा उभी केली असून, आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. निवडणूक काळात तीनवेळा खर्च निरीक्षक मतदारसंघात येऊन उमेदवारांच्या खर्चाची विवरणपत्रे पाहणार आहेत.खर्च सादर करण्याची पद्धत निवडणूकलढविणाऱ्या उमेदवाराला विहित नमुन्यातच निवडणूक खर्च सादर करायचा असून, त्यासाठी निश्चित केलेल्या दरसूचीप्रमाणेच खर्चाचे आकडे टाकायचे आहेत. आज केलेला खर्च हा तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. २० हजार पर्यंतच्या किरकोळ खर्चाची रक्कम स्वत:च्या नावे धनादेशाद्वारे काढून मगच पैशांचे वाटप संबंधितांना करायचे आहे. वीस हजार रुपयांपर्यंतचे देणे हे संबंधितांच्या नावे धनादेशाद्वारेच भागवायचे आहे. खर्च न दिल्यास कारवाईनिवडणूकआयोगाच्या नियमांप्रमाणे जे उमेदवार खर्च सादर करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तातडीची कारवाई म्हणून उमेदवाराने प्रचारात आणलेल्या सर्व वाहनांचे परवाने रद्द केले जातील. त्यानंतर त्यांच्या सभांना परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर पुढची कारवाई होईल.
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत वॉच...मद्य, पैसा वाटपावरचार पथकांची नजर :
By admin | Published: September 23, 2014 12:27 AM