कोल्हापूर : कडाक्याच्या थंडीने दोन फिरस्त्याचा मृत्यू ही लोकमतमधील बातमी वाचून कोल्हापूरातील व्हॉटस ग्रुपचे संवेदनशील सदस्यांनी गुरुवारी मध्यरात्री शहरात थंडीने कुडकुडणाऱ्या फिरस्त्यांना उबदार आधार दिला.कोल्हापूरातील डॉ. रासकर मित्र परिवार आणि अमिताभ बच्चन प्रेमी या दोन व्हॉटसअप ग्रुपवर लोकमतमधील फिरस्त्याचा थंडीने मृत्यू ही बातमी पसरली. या ग्रुपमधील काही संवेदनशील सदस्यांनी मित्र परिवाराला सोबत घेऊन आपल्या ग्रुपच्या माध्यमातून या फिरस्त्यांना शाल, स्वेटर्स , कानटोपी आणि ब्लँकेट्स वाटण्याचे आवाहन केले गेले,आणि काही मिनिटातच ग्रुपमधील अनेकांनी सहकार्याचे हात पुढे केले. पाहता पाहता १८ मित्र आपल्या जवळच्या उबदार वस्तूंनीशी या उपक्रमासाठी स्वत: हजरही राहिले.
या उपक्रमासाठी कोल्हापूर शहरातील प्रसाद गवस, देवेन वासदेकर आणि निलेश बहिरशेट यांच्या दुकानात साहित्य आणून देण्यासाठी विनंतीही केली होती, त्या प्रमाणे काहींनी उपलब्ध तर काहींनी नवीन साहित्य विकत घेऊन आणून दिले. ग्रुपचे सदस्य मोहन जाधव, संध्या कदम, निलिमा नवांगुळे यांनी हे साहित्य याठिकाणी जमा केले होते, तर किरण रणदिवे आणि विजय तांबे यांनी सर्व नियोजन व्यवस्थित करून कोल्हापुरातल्या सर्व दिशांना फिरण्याचा मार्ग तयार केला.
हे सर्व १८ सदस्य गुरुवारी मध्यरात्री कोल्हापुरातल्या हरेक रस्त्यावर फिरून बेघर, बेवारस, वृद्ध लोकांना शाल ब्लँकेट, स्वेटर्स वाटत फिरले. प्रफुल्ल गोटखिंडीकर यांच्या कारमध्ये ठेवलेल्या सर्व उबदार वस्तू योग्य माणसांचा शोध घेऊन वाटल्या जात होत्या.
मध्यरात्री दिला पूर्णविरामहे सर्व १८ सदस्य गुरुवारी मध्यरात्री कोल्हापुरातल्या हरेक रस्त्यावर फिरून बेघर, बेवारस, वृद्ध लोकांना शाल ब्लँकेट, स्वेटर्स वाटत फिरले. प्रफुल्ल गोटखिंडीकर यांच्या कारमध्ये ठेवलेल्या सर्व उबदार वस्तू योग्य माणसांचा शोध घेऊन वाटल्या जात होत्या. ह्या सर्व लोकांचा उत्साह कौतुकास्पद होता.
भवानी मंडप येथून सुरू झालेला हा उबदार कपडे वाटपाचा प्रवास संपूर्ण कोल्हापूर पालथे घातल्यावर पुन्हा भवानी मंडप येथे मध्यरात्री १ वाजता पूर्णविराम दिला. ग्रुपमधील सर्वच मित्रांनी त्यांना माहित असलेल्या ठिकाणी म्हणजे पुतळे, बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, तावडे हॉटेल परिसर अशा अनेक ठिकाणी जाऊन, शक्य तेवढ्या फिरस्त्यांचा शोध घेऊन त्यांना ह्या उबदार वस्तू देऊ केल्या.यांनी घेतला प्रत्यक्ष सहभागया उपक्रमात स्वप्नील पार्टे, मेघाताई पेडणेकर, निलेश बहिरशेट, अमर कोळेकर, कविता कोळेकर, किरण रणदिवे, मुकेश जाधव, ओंकार जाधव, श्रीनिवास कलबुर्गी, विजय तांबे, रोहन वर्पे, सुहास मुसळे, अरुणा मुसळे, ऐश्वर्या मुनिश्वर, प्रवीण हरंगपुरे, शुभ्रा पेडणेकर, स्वरा मुसळे आणि स्वत: डॉ. देवेंद्र रासकर यांनी प्रत्यक्ष भाग घेतला.
थंडीने काकडणाऱ्या या फिरस्त्यांना तुमचा उबदार हात लावून बघा, त्यांच्या रुक्ष, मळकट, कुबट, वासाळलेल्या कपड्यांतून तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी उठलेल्या हातांतून आयुष्यभराची ऊब तुम्हांला मिळाल्याशिवाय राहणार नाही.डॉ. देवेंद्र रासकर,अॅडमिन, डॉ. रासकर मित्र परिवार,अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप, कोल्हापूर