शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

परतीच्या पावसाने कोल्हापूरला झोडपले, तासभर रस्ते सामसूम; खरीप पिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:02 PM

गणेश मंडळांची तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसाविना अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. तब्बल एक तास एकसारख्या संततधार सुरू राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. मंगळवारपर्यंत (दि. २) जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.यंदा मान्सून काहीसा नाराज आहे. जुलै महिन्याचा अपवाद वगळता पाऊसच झालेला नाही. पावसाळ्याचे चार महिने संपत आल्याने पाऊस होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. मंगळवारी सकाळपासून वातावरणात काहीसा बदल होत गेला. ढगाळ, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.दुपारनंतर आकाश गच्च झाले आणि सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर शहरासह परिसरात पावसाने सुरुवात केली. तासभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरच पाणी राहिल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. गटारीत पाणी न बसल्याने काही ठिकाणी रस्त्यावर आले होते.दरम्यान, मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून आगामी पाच-सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.गणेश मंडळांची तारांबळकोल्हापूर शहरात गणेश मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. नेमका सायंकाळच्या वेळी जोरदार पावसाने सुरुवात केल्याने देखाव्याचे मंडप झाकण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसले.

तासभर रस्ते सामसूमकोल्हापूर शहरात संततधार पाऊस सुरू होता. या कालावधीत एरवी गजबजलेले रस्ते अक्षरश: ओस पडले होते. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या वाहनचालक तासभर अडकून पडले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस