शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

कोल्हापूर : शौचालये झाली, ड्रेनेज लाईन कधी? स्थायी समिती सभेत विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 11:36 AM

ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल स्थायी समिती सभेत नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

ठळक मुद्देशौचालये झाली, ड्रेनेज लाईन कधी? स्थायी समिती सभेत विचारला प्रश्न

कोल्हापूर : पांजरपोळ परिसरातील नागरी वस्तीत खासगी संस्थेने मोफत घरगुती शौचालये बांधून दिली, पण महानगरपालिका प्रशासनास या वस्तीत अद्याप ड्रेनेज लाईन टाकता आलेली नाही; त्यामुळे नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी याबाबतचा विषय शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उपस्थित करून ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.गेल्या काही दिवसांपासून निधी नसल्याचे कारण देत प्रशासन ड्रेनेज लाईन टाकण्यास चालढकल करीत आहे; त्यामुळे एखाद्या सामाजिक संस्थेने मोफत शौचालये बांधून देऊनसुध्दा त्याचा उपयोग झालेला नाही. ज्या हेतूने शौचालये बांधण्यात आली, त्याचा हेतूच साध्य झालेला नाही.

नागरिकांच्या शौचालयाचे पाणी शेवटी उघड्या गटारीत येत आहे; त्यामुळे भाग्यश्री शेटके यांनी त्याचा वारंवार पाठपुरावा केला; मात्र निधी नसल्याचे कारण देत काम करण्यास टाळले. त्याबद्दलचा संताप त्यांनी स्थायी सभेत व्यक्त केला.पांजरपोळ भागात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी २१ लाखांचे इस्टिमेट तयार केले असून त्यामधील सात लाखांचे बजेट उपलब्ध आहे; त्यामुळे हे काम प्राधान्याने करू, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य, लाईटसंबंधी तक्रारी दिल्या तर तीन- चार दिवस त्यांचे निराकरण होत नाही; परंतु आॅनलाईन तक्रार दिल्यास चोवीस तासांत निराकरण केले जाते. नगरसेवकांच्या तक्रारीला महत्त्व दिले जात नाही, अशी तक्रार प्रतीक्षा पाटील यांनी सभेत केली.नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आढावा बैठकीत दिल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.खुल्या जागांवर उभारण्यात आलेल्या हॉलचा ताबा कोणाकडे आहे, अशी विचारणा करत साळोखेनगर येथील दोन हॉल अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत.

शहरात असे किती हॉल महापालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत याची माहिती स्थायी समितीला द्या, अशी मागणी प्रतीक्षा पाटील यांनी केली. यावेळी झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चेत दीपा मगदूम, संजय मोहिते यांनीही भाग घेतला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर