शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोल्हापूर  : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 5:52 PM

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारा दप्तराचा भार त्यांच्या कोवळ्या शरीराला न पेलवणारा असल्याने, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांनी मुंबईमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी टॅब वाटप केले, त्याच धर्तीवर पुढील काळात शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याकरिताशालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचा उपक्रम हाती घेणार, असे प्रतिपादन गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देदप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागरआमदार फंडातून शाळांना संगणक वाटप

कोल्हापूर  : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारा दप्तराचा भार त्यांच्या कोवळ्या शरीराला न पेलवणारा असल्याने, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांनी मुंबईमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी टॅब वाटप केले, त्याच धर्तीवर पुढील काळात शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याकरिताशालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचा उपक्रम हाती घेणार, असे प्रतिपादन गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर शहरातील पाच शाळांना संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. क्षीरसागर म्हणाले, मुले ही उज्ज्वल देशाचे भवितव्य असून, त्यांच्यावर कोणतेही दडपण न आणता त्यांच्या मनावर सुसंस्कार घडविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.‘शिवचरित्र’ या विषयावर बोलताना इतिहास संशोधक डॉ. अमर आडके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे न करता सुराज्य उभे केले. पालकांना मुलांना कसे घडवायचे याचे मार्गदर्शन ‘शिवचरित्रा’मधून होते. विद्यार्थ्यांनी आपला इतिहास जपावा, संस्कृती वाढवावी, असे आवाहन केले.यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू १५ रुग्णांना मंजूर करण्यात आलेल्या निधी धनादेशाचे वितरणही करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपमहापौर उदय पोवार, माजी स्थायी समितीचे सभापती सुनील मोदी, ‘जनता बझार’चे स्वीकृत सदस्य जयवंत हारुगले, महिला आघाडी शहरप्रमुख मंगलताई साळोखे, अरुण सावंत, पद्माकर कापसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच शाळांना संगणकाचे वाटपयानंतर शहरातील आयर्विन ख्रिश्चन इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, राजारामपुरी, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, भवानी मंडप, कोल्हापूर आदर्श विद्यालय, साकोली कॉर्नर, विद्यामंदिर श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित दत्ताबाळ विद्यामंदिर या शाळांना संगणक संचाचे वितरण आमदार राजेश क्षीरसागर आणि डॉ. अमर आडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर