शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Kolhapur: डॉ.नंदाताई बाभूळकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 9:27 AM

Dr. Nandatai Babhulkar: विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या, नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.नंदिनी सुश्रुत बाभूळकर यांचा आज, रविवारी (१८) गडहिंग्लजमध्ये रत्नमाला घाळी 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरव होत आहे.

- राम मगदूमकोल्हापूर - विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या, नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.नंदिनी सुश्रुत बाभूळकर यांचा आज, रविवारी (१८) गडहिंग्लजमध्ये रत्नमाला घाळी 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरव होत आहे.यानिमित्ताने त्यांच्या वैद्यकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरीला  उजाळा मिळाला असून कुपेकरप्रेमींनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छादेखील  'जाहीर'पणे दिल्या आहेत. त्यामुळे'चंदगड'च्या राजकारणात ' त्या' पुन्हा सक्रीय होणार कां? याचीच गडहिंग्लज विभागासह जिल्हयात चर्चा आहे.

२०१२ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांचे आकस्मिक निधन झाले.त्यानंतर शरद पवारांनी 'चंदगड'च्या पालकत्वाची जबाबदारी  कुपेकरांच्या पत्नी संध्यादेवी यांच्यावरच टाकली.त्यावेळी नंदाताई हिमतीने आईच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.त्यामुळे संध्यादेवी दोनवेळा आमदार झाल्या.परंतु,त्यांच्या यशस्वी वाटचालीच्या खऱ्या सूत्रधार नंदाताईच राहिल्या.

दरम्यान, संध्यादेवींनी प्रकृती आणि  वयोमानामुळे गेल्यावेळची निवडणूक लढविण्यास  असमर्थता दाखवली.त्यामुळे नंदाताईंनी निवडणूक लढवावी,असा नेतृत्वाबरोबरच  कार्यकर्त्यांचाही आग्रह होता.त्यामुळे नकारानंतरही पुन्हा लढण्याची तयारी त्यांनी दाखवली होती.परंतु, उमेदवारी दाखल करण्यासाठी 'चंदगड'ला येत असतानाच  नागपूरच्या विमानतळावरून अचानकपणे त्या माघारी परतल्या.म्हणूनच,राजेश पाटील यांना संधी मिळाली.

म्हणूनच, दोन्हीकडून 'ऑफर' !दीर्घकाळ रखडलेल्या उचंगी प्रकल्पाला पूर्णत्व,कोवाड,कुरणी,हडलगे या पूलांचे बांधकाम, चंदगड नगरपंचायत,ट्रामा केअर सेंटर मंजुरी आणि प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प हलकर्णी एमआयडीसीतून हद्दपार करण्याबरोबरच राज्यात 'भाजप'ची सत्ता असतानाही 'चंदगड'च्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मिळवण्यात नंदाताईंनी महत्वाची भूमिका बजावली होती.म्हणूनच,गेल्यावेळी  राष्ट्रवादीसह भाजपानेही त्यांना उमेदवारीची 'ऑफर' दिली होती.

'नंदाताईं'च्या पुनरागमनाविषयी उत्सुकताशरद पवारांच्या वाटचालीतील प्रत्येक राजकीय वळणावर कुपेकर त्यांच्यापाठीशी हयातभर खंबीरपणे राहिले.'राष्ट्रवादी'तील फुटीनंतर संध्यादेवीदेखील शरद पवारांच्यासोबत आहेत. कोल्हापूरच्या सभेलाही त्या उपस्थित होत्या.त्यामुळे पवारांनी 'शब्द' टाकल्यास नंदाताईंना यावेळी नकार देता येणार नाही.म्हणूनच,कुपेकरप्रेमींसह सर्वांनाच  ताईंच्या पुनरागमनाविषयी उत्सुकता आहे.

मुश्रीफांचे भाकीत, समर्थकांच्या शुभेच्छा !'एव्हीएच'विरोधातील लढाई जिंकल्यानंतर हसन मुश्रीफांही नंदाताईंचे जाहीरपणे कौतुक केले होते.'आज शाहु महाराज असते तर त्यांनी नंदाताईंची बग्गीतून मिरवणूक काढली असती.त्यांच्या सासर- माहेरच्यांनी संमती दिली तर त्या  चंदगडच्या भावी आमदार असतील' असे भाकीतही त्यांनी केले होते.पण,नंदाताईंनी निवडणूकच लढवली नाही.पाचवर्षांपासून त्या राजकारणापासूनही दूर आहेत.तरिदेखील पुरस्काराच्या निमित्ताने अजित पवार - मुश्रीफ समर्थकांनी ताईंच्या 'भावी वाटचाली'साठी शुभेच्छा दिल्या आहेत,त्याचीच विशेष चर्चा आहे.

नंदाताईंच्या 'भाषणा'कडे सर्वांचे लक्ष!आईसाहेब व आपण कुणीही विधानसभा निवडणूक लढवणार नाही हे जाहीर करताना  नंदाताई अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्यानंतर कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला त्या आल्या नाहीत.त्यामुळे पुरस्काराला उत्तर देताना काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड