कोल्हापूर : सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी. त्यामध्ये तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.शाहू स्मारक भवनात आयोजित एका कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार शेट्टी म्हणाले, मुळात ऊस हा ११ महिन्यांपासून १८ महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात उभा असतो.
म्हणजे दीड वर्ष त्यामध्ये शेतकऱ्याने गुंतवणूक केलेली असते. त्याचे व्याजही भरावे लागते. अशा परिस्थितीत ‘एफआरपी’चे तुकडे पडल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘एफआरपी’चे तुकडे होऊ देणार नाही, असा निर्णय कोणी घ्यायचा प्रयत्न केल्यास तो सहनही केला जाणार नाही.