कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या हाफ महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी (दि. २१) ‘प्रोमो-रन’ होणार आहे. या स्पर्धेने महामॅरेथॉनचे बिगुल वाजणार आहे. या ५ आणि १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यात कोल्हापूरकरांसह अनेक धावपट्टू, खेळाडू धावणार आहेत.
महामॅरेथॉनच्या वातावरण निर्मितीसाठी होणाऱ्या या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. कोल्हापूरकरांना या मॅरेथॉनची उत्सुकता लागली आहे. ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी (दि. २१) ‘प्रोमो-रन’ आयोजित केली आहे.५ आणि १० किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत सहभागी होण्याची कोल्हापूरकरांना संधी मिळणार आहे. महामॅरेथॉनच्या वातावरणनिर्मितीसाठी होणाऱ्या या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे.
कोल्हापूरकरांना या मॅरेथॉनची उत्सुकता लागली आहे. अॅथलेटिक्स खेळाला प्रोत्साहन आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे दि. १८ फेब्रुवारीला महामॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेची पूर्वतयारी आणि वातावरण निर्मितीसाठी रविवारी (दि. २१) ‘प्रोमो-रन’चा उपक्रम आयोजित केला आहे. ५ आणि १० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा पोलीस ग्राउंड येथून सुरू होणार आहे.
कोल्हापूरमधील सर्वांत मोठ्या या स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीत अनेक व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग आहे. या महामॅरेथॉनसाठी कोल्हापूरकरांनी ‘प्रोमो-रन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय दर्जाची ही महामॅरेथॉन आहे. त्यामुळे रविवारी होणारी ‘प्रोमो-रन’देखील त्याच पद्धतीने होणार आहे. सर्व प्रकारच्या सुविधा, साधनांनी युक्त ‘प्रोमो-रन’ असणार आहे. कोल्हापूरमधील अॅथलेटिक्सच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. विविध संस्था, व्यक्ती या महामॅरेथॉनच्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
असा राहणार ‘प्रोमो-रन’चा मार्ग
- * ५ किलोमीटर : पोलिस ग्राऊंड -धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल -महासैनिक दरबार हॉल- पोलिस लाईन चौक- पोलिस ग्राऊंड.
- *१० किलोमीटर : पोलिस ग्राऊंड- धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल- महासैनिक दरबार हॉल-धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल-महाराणी ताराराणी चौक-धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल-पितळी गणपती मंदिर- सेंट झेवियर्स स्कूल-पोलिस ग्राऊंड.
वाहतुकीसाठी हे मार्ग राहणार बंदया प्रोमो-रनमधील ५ किलोमीटरचा मार्ग हा वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने, तर १० किलोमीटरचा मार्ग हा एकाबाजूने बंद राहणार आहे, तरी याची नोंद शहरवासीयांनी घ्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.