कोल्हापूर : रंकाळा, अंबाई टँक येथे फिरायला आलेल्या युवतीच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स लंपास केल्याची साळोखे पार्क येथील चोरट्याने कबुली दिली आहे. त्याचेवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित महेश राजाराम गायकवाड (वय १९) असे त्याचे नाव आहे. त्याचे अन्य तीन साथीदार संशयित आशिष गायकवाड, प्रकाश बागडे, संतोष मोठे (सर्व रा. राजेंद्रनगर) हे पसार असून त्यांचा राजारामपूरी व जुनाराजवाडा पोलीस शोध घेत आहेत.औद्योगिक वसाहतींमध्ये परप्रांतीय कामगारांना रस्त्यात अडवून त्यांचे मोबाईल, रोख रक्कम, दागिने काढून लुटमारी केलेप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी संशयित महेश गायकवाड याला अटक केली आहे. त्याचे ताब्यातून सोळा मोबाईल जप्त केले होते.
त्याने अंबाई टॅक, रंकाळा तलाव येथील मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स चोरलेची कबुली दिली होती. त्यानुसार पोलीसांनी मोबाईलवरुन शोध घेतला असता निकीता महेश चित्रगार (वय २१, रा. रामानंदनगर) हिचा असलेचे निष्पन्न झाले.
ती ११ मार्च रोजी फिरायला रंकाळा परिसरात आली होती. त्यावेळी तिच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्सची चोरी झाली होती.