कोल्हापूर : दिवसेंदिवस लाकडाची आणि गोवऱ्यांची भासणारी टंचाई, मनुष्यवस्तीला भेडसावणाºया धूर आणि दुर्गंधीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा पर्याय पुढे आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी अत्याधुनिक गॅस दाहिनी कार्यान्वित होत आहे. त्याचे प्रात्यक्षिक येत्या चार दिवसांत घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमी अपुरी पडत आहे. या स्मशानभूमीला नागरी वस्तीने गराडा घातला आहे. या परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारांचा धूर, दुर्गंधीचा त्रास होत आहे तसेच पर्यावरणाची ºहासही होत आहे. जंगलांच्या कमतरतेमुळे लाकडे, गोवºयांची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे आता शहरवासीयांनी अंत्यसंस्कारांसाठीची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम बडोद्यातील अल्फा इक्विपमेंट कंपनीच्या वतीने सुरू आहे.
अल्फा इक्विपमेंट कंपनीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण हे मूळचे कोल्हापूरचे असले तरी ते अनेक वर्षे बडोद्यात स्थायिक आहेत. जन्मभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी कोल्हापुरात मोफत गॅस दाहिनीचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला; पण डिझेल दाहिनीचा पूर्वानुभव पाहता महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले.दरम्यान, अल्फा इक्विपमेंट कंपनीच्या पाठपुराव्यानंतर गेल्या वर्षी महापालिकेच्या काही पदाधिकारी आणि अधिकाºयांनी गुजरात येथे जाऊन गॅस दाहिनीची पाहणी केली. त्यानंतर ही गॅस दाहिनी कोल्हापुरात बसविण्याचा निर्णय महासभेत झाला. कंपनीने चार महिन्यांपूर्वी गॅस दाहिनी कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीत जोडण्याचे काम सुरू केले.
दोन दिवसांपूर्वी कंपनीच्या चार तंत्रज्ञांनी येऊन गॅस दाहिनीचा सांगाडा जोडण्याचे काम सुरू केले आहे. येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण होऊन मृतदेहांवर गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कारांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरपासून ही गॅस दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास व्यक्तहोत आहे. दाहिनीतील गॅसचा खर्च समाजातील काही दानशूर लोकांनी, संस्थांनी करण्याची तयारी दाखविली आहे...भावनेचाही आदरमृतदेहाचे दहन गोवºया व लाकडांवर करण्याची कोल्हापूरकरांंची भावना आहे; त्यामुळे गॅस दाहिनीत मृताच्या नातेवाइकांच्या विनंतीनुसार मोजकी लाकडे व गोवºया ठेवून भावनिकता ही जपण्याची सोय करण्यात आली आहे.
या शहरांत आहेत गॅस दाहिनीगुजरात येथे बडोदा, गांधीनगर, सूरत, सिद्धपूर येथे; तर महाराष्टÑात मुंबईतील मालाड, गोरेगाव, वाळकेश्वर, खडकी (पुणे) येथेही या कंपनीच्या गॅस दाहिन्या सुरू आहेत, तर सांगलीमध्ये दोन गॅस दाहिन्यांचा प्रस्ताव आहे.खोली आणि फौंडेशनपंचगंगा स्मशानभूमीतील बंद पडलेल्या डिझेल दाहिनीच्या इमारतीतच ही गॅस दाहिनी बसविण्यात येत आहे.दाहिनीसाठी फौंडेशन आणि शेजारी २२ सिलिंडर ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली बांधणे आवश्यक आहे. तिचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच गॅस दाहिनी सुरू होईल.लाकूड व गोवारीवर दहन गॅस दाहिनी१) खर्च (एक मृतदेह) २२०० ते २५०० रुपये ७०० ते ८०० रुपये२) वेळ ८ तास ९० मिनिटे३) प्रदूषण धूर, दुर्गंधी गॅस व धूर एका टाकीत जमा करून तो पाण्यात घुसळून वायू ६५ फूट उंच चिमणीद्वारे हवेत४) राख किमान २५ किलो किलोभर राख जमाकोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी बसविण्यात येत असलेल्या गॅस दाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.