कोल्हापूर : यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस झाला असला तरी हातकणंगले तालुक्यात सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. आतापर्यंत शाहूवाडी, करवीर, कागल व भुदरगड तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस चांगला असला तरी नुकसानही अधिक झाले आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तांच्या पडझडीत सव्वा तीन कोटींचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात यंदा जूनपासून सुरू झालेला पाऊस तीन महिने एकसारखा सुरू राहिला. सप्टेंबर महिन्यात पावसाची उघडझाप राहिली असली तरी याच महिन्यात जिल्हा पावसाची सरासरी ओलांडेल, असा अंदाज होता; पण आतापर्यंत सरीसरीच्या ८८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस कागल तालुक्यात सरासरीच्या १६८ टक्के झाला आहे. शाहूवाडी तालुक्यात १६० टक्के, भुदरगडमध्ये १३०, तर करवीरमध्ये १०८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी शिरोळ, शाहूवाडी, कागल तालुक्यांनी सरासरी ओलांडली होती; पण यंदा शिरोळ तालुका मागे असून ८७ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी सर्वांत कमी पाऊस राधानगरी तालुक्यात ४८ टक्के झाला होता. यंदा मात्र ६१ टक्क्यांवर पाऊस पोहोचला आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी असल्याने पडझडीचे प्रमाणही कमी होते. खासगी व सार्वजनिक ३४० मालमत्तांची पडझड होऊन ७४ लाख ९२ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले होेते. यंदा पाऊस जास्त असल्याने १३८४ मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ३ कोटी २१ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. जनावरांचेही नुकसान झाले असून दुधाळ अकरा व इतर नऊ अशी वीस जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.सहाजणांनी गमावला जीवयंदा पावसामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली; पण त्याबरोबर जीवितहानीही झाली. चार महिन्यांत सहा व्यक्तींना जीव गमावावा लागला. त्यांपैकी एकाला चार लाखांची मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.तालुकानिहाय गेल्या दोन वर्षांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
तालुका गतवर्षीचा यंदाचा पाऊसहातकणंगले ४७४ ४६६शिरोळ ३३६ ४१५पन्हाळा ११२५ १२३७शाहूवाडी २४७० १७१०राधानगरी २१५१ १७०२गगनबावडा ३८७६ ३१०२करवीर ८६२ ७२२कागल १०९५ ९३७गडहिंग्लज ७३९ ६४६भुदरगड १७६० १२६८आजरा १७४२ १४४४चंदगड २१४८ १६१७-----------------------------------------------------------------एकूण १८७८० १५२७०