कोल्हापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरुन जरगनगर -पाचगांव रस्त्यावर रिव्हॉल्वरमधून तरुणावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली. प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय २८, रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगांव, ता. करवीर) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे.
प्रतिक सरनाईकवर यापूर्वीही इचलकरंजी येथे काही गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासात जुन्या भांडणाच्या कारणावरुन वादातून हा खून झाला असला तरी तो नेमका कोणत्या कारणासाठी झाला, या दृष्टिने पोलिस तपास करीत आहेत.
यावेळी सरनाईकने सागरची गळपट्टी धरुन त्यास शिवीगाळ केली. प्रतिक पोवारने सरनाईकला अडविले. ‘सागर माझ्यासोबत आला आहे, त्याला शिवीगाळ करु नकोस, तु त्याची गळपट्टी सोड ’. प्रतिक पोवार सरनाईकला समजावत होता, तरीही,सरनाईक पुन्हा त्याला शिवीगाळ करु लागला. या रागातून प्रतिक पोवारने सरनाईकची गळपट्टी धरली. त्यावेळी या दोघांची भांडणे गौरव वडेर आणि शुभम पवारने सोडविली.‘मी लघुशंकेला जाऊ काय असे सरनाईकने विचारल्यावर गौरवने त्यास जाऊन ये असे सांगितले. सरनाईक लघुशंकेला जाऊन त्यांच्याजवळ आला. त्याने कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून त्याने थेट प्रतिक पोवारच्या डोक्यात गोळया झाडल्या. शुभम आणि गौरववर रिव्हॉल्वर रोखले. ‘तुम्ही येथून निघून जावा, नाहीतर तुम्हालाही गोळी घालून अशी धमकी त्याने दिली. सागर कांबळे यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून माझ्या दुचाकीवर बस असे म्हणत दुचाकीवरुन घेऊन निघुन गेला.दरम्यान, हा प्रकार समजताच घटनास्थळी करवीर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव,पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी गेले. पोलिसांनी पंचनामा करुन प्रतिक पोवारचा मृतदेह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मध्ये नेला. ही घटना समजताच जरगनगर परिसरातील नागरिकांनी आणि प्रतिक पोवारच्या मित्रांनी सीपीआरमध्ये रात्री गर्दी केली होती.जरगनगरमध्ये शांतता, पोलिस बंदोबस्त...जरगनगर-आर.के.नगरकडे रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. प्रतिक पोवारचा खून झाल्याचे समजताच सोमवारी दिवसभर या परिसरात शांतता होती.वाद सागरसोबत, खून त्याच्या मित्राचासंशयित प्रतिक सरनाईकचा सागर कांबळे याच्याशी जुने भांडण होते. यावेळी सरनाईकने सागरला शिवीगाळ केली आणि त्याची गळपट्टी धरली. सागरसोबत तेथे आलेला त्याचा मित्र प्रतिक पोवारने सरनाईकला अडविले. तो ऐकत नसल्याचे पाहून प्रतिकने सरनाईकची गळपट्टी धरली. ती भांडणे गौरव वडेर आणि शुभम पवारने सोडविली. परंतु थोड्याच वेळात सरनाईकने लपवून ठेवलेली रिव्हॉल्व्हर घेउन येत प्रतिकच्या डोक्यात गोळी घातली. सागरसोबतच्या वादात पडल्याने त्याचा मित्र प्रतिकचा हकनाक बळी गेला आहे.