शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

कोल्हापूर : युवा संसदेमध्ये शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ठरले उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:08 AM

चौदाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा शिवाजी विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली. या संघाला विभागीय स्तरावर अव्वल दर्जाचीकामगिरी बजावल्याबद्दल

ठळक मुद्देपहिल्यांदाच यश; नवी दिल्लीत पारितोषिक वितरणस्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ सहभागी झाले.

कोल्हापूर : चौदाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा शिवाजी विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली. या संघाला विभागीय स्तरावर अव्वल दर्जाचीकामगिरी बजावल्याबद्दल आणि या संघातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स प्राईझ विनर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्लीतील संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते झाला. विभागीय सांघिक पारितोषिकासह संघातील निकिता पिसे, अभिजित ताम्हणकर, शैलेश चिले, श्रेयश मोहिते, विनायक साळुंखे, गौरी काटे, हेरंब सावंत, आकांक्षा पाटील या विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स् प्राईस विनर हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ सहभागी झाले.विद्यापीठाचा लौकिक उंचावलाया संघाने चषकासह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करून संघातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा लौकिक उंचावला आहे. या यशाचा विद्यार्थ्यांना भावी जीवनात निश्चितपणे सकारात्मक लाभ होईल. सार्वजनिक जीवनात वावरतानाही देशाचा लौकिक वाढेल, असे योगदान त्यांनी द्यावे.राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेतील विभागीय स्तरावरील विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. प्रल्हाद माने आणि विद्यार्थ्यांनी सुपूर्द केला.