शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

कोल्हापूर जिल्हा परिषदेत एमटेक, डॉक्टर झाले शिपाई; अनुकंपामध्ये मिळाली ती नोकरी स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 1:36 PM

कोल्हापूर : सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारण्याकडे युवक-युवतींचा कल वाढला आहे. याचे प्रत्यंतर जिल्हा परिषदेच्या ...

कोल्हापूर : सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारण्याकडे युवक-युवतींचा कल वाढला आहे. याचे प्रत्यंतर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीवेळी आले आहे. एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केलेल्या युवकाने आणि बीएएमएस डॉक्टर झालेल्या युवतीने शिपाईपदावर काम करण्यास तयारी दर्शवत नोकरीचा आदेश स्वीकारला आहे.याच आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने ५० जणांना अनुकंपा तत्त्वावरील भरतीचे आदेश देण्यात आले. यापैकी तब्बल ३५ जागा परिचर, म्हणजे शिपाईपदाच्या होत्या. परंतु मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांचे शिक्षण जास्त असले तरी त्यांच्या शिक्षणासाठी पूरक असणाऱ्या जागा जिल्हा परिषदेत रिक्त नसल्याने, अखेर आहे त्या पदाच्या नोकऱ्या स्वीकाराव्या लागल्या आहेत. एक महिला बीएबीएड आहे, एका युवतीने बीएडीएड केले आहे, अन्य एका युवकाने बी.ई. मेकॅनिकल, बीकॉम असलेल्या युवकाने शिपाईपदाची मिळालेली नोकरी स्वीकारली आहे.तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या युवकाने कंत्राटी ग्रामसेवकपदाची नोकरी स्वीकारली असून, आयुर्वेद डॉक्टर झालेल्या एका युवतीनेही शिपाईपद स्वीकारले आहे. एकूणच बेरोजगारीची परिस्थिती पाहता ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार ज्याला-त्याला नोकरी मिळत नसल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारून जगण्याची मानसिकता दिसून येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद