शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर : प्रत्येक सदस्याला ६ लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 6:20 PM

गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर प्रत्येक सदस्याला ६ लाखाचा निधीगर्भसंस्कारापासून लॅपटॉपपर्यंतच्या नाविन्यपूर्ण योजना

कोल्हापूर : गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.अर्थ समितीचे सभापती अंबरिष घाटगे यांनी राजर्षि शाहू सभागृहामध्ये हा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून यातून प्रत्येक सदस्याला ६ लाख रूपयांचा स्वनिधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बहुतांशी सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून काही बाबींवरची तरतूद वाढवण्याची मागणी केली आहे. अनेक नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश हे या अर्थसंकल्पाचे मोठे वैशिष्ट्य ठरलेआहे.सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी या अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून जिल्हा परिषदेच्या मालमत्ता विकसित करण्यासाठी निधी वाढवण्याची मागणी केली. सौरउर्जेवरच्या साधनांची योजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी भजनी मंडळाना साहित्य देण्याची तर राहूल आवाडे यांनी वडगाव, हुपरी नगरपरिषद गोळा करणारा शिक्षण कर जिल्हा परिषदेकडे घेण्याची मागणी केली.

वंदना जाधव यांनी शोष खडड्यावरील निधी तर प्रविण यादव यांनी शिवा काशिद स्मारकावरील निधी वाढवण्याची मागणी केली. सेंद्रीय शेतीवर निधीची मागणी हंबीरराव पाटील यांनी तर राजवर्धन निंबाळकर यांनी लॅपटॉपची मागणी केली. सतीश पाटील यांनी अखर्चित निधीबाबत विचारणा केली.

नाविन्यपूर्ण योजनां

  1.  राजमाता जिजाऊ गर्भसंस्कार योजना (तरतूद १0 लाख)-गरोदर मातांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, योगाभ्यास, प्रसुतीपूर्व गर्भसंस्कार, नवजात बालकाची काळजी घेण्याची माहिती दिली जाणार आहे.
  2.  शिक्षणतजज्ञ डॉ.जे. पी.नाईक शताब्दी शाळा सन्मान योजना, जिल्ह्यातील ७५ प्राथमिक शाळा यंदा १00 वर्षे पूर्ण करत आहेत. त्या शाळांच्या सन्मान करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
  3.  डॉ.जयंत नारळीकर विज्ञान जागृती अभियान (५ लाख), आयुका, इस्त्रो, नेहरू तारांगण मुंबईला विद्यार्थ्यांची भेट घडवून आणणे
  4.  डॉ. विक्रम साराभाई विज्ञान मेळावा (१ लाख)
  5. डॉ. सी. व्ही. रामन समृध्द प्रयोगशाळा (२0 लाख), यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना विज्ञानसाहित्य पुरवले जाणार आहे.
  6. कृषितजज्ञ डॉ. स्वामीनाथन भुसंजीवनी योजना, याअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर हिरवळीच्या खतांचे बी बियाणे दिले जाणार आहे.
  7.  कामधेनू महिला प्रशिक्षण योजना (७ लाख), यातून महिलांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  8.  दलित वस्तींमध्ये रमाई वाचनालय (४0 लाख)
  9.  दिव्यांग मित्र अभियान (३0 लाख), यातून दिव्यांगाना अ‍ॅडाप्टरसह मोटारसायकल देण्यात येणार आहे.
  10.  डॉ. पंजाबराव देशमुख दिव्यांग शेती साहित्य योजना
  11.  तारांगणा, यातून कला व क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा गौरव करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये१  पॉवर टिलर, रोटावेटर, बिडरसाठी (२५ लाख रूपये)२  जैविक व घनकचरा विघटनासाठी (२५ लाख)३  वर्गखोल्या डिजिटल करणे (४९ लाख)४  प्राथमिक व माध्यमिक शाळांना सांस्कृतिक व क्रीडा साहित्य पुरवणे (२५ लाख)५  कडबाकुट्टी, सुधारित औजारे, पाईप्स पुरवणे (१ कोटी ४0 लाख)६  पशूधन जळितग्रस्त झाल्यास अर्थसहाय्य(३ लाख)७  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे (५0 लाख)८  समाजमंदिरांमध्ये व्यायामशाळा उभारणे ( ५0 लाख)९  मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगार साधने पुरवणे (९५ लाख)१0  मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवणे (२0 लाख)११  पाझर, गाव तलावातील गाळ काढण्यासाठी ( ३१ लाख)१२ पिठाची गिरणी, पिको फॉल मशिन,सायकल पुरवणे (४0 लाख)

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरBudget 2018अर्थसंकल्प २०१८