कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शनिवारी प्रतिमा पूजन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी शनिवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडंकरांची जयंती ही लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात यावी. आजचा दिवस हा अभिमानाचा दिवस असून समाजात एकता, अखंडता आणि बंधुभाव अबाधित राहण्यासाठी आंबेडकरांचे कार्य आणि विचार आचरणात आणणे आवश्यक आहे.यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारीत चित्रफित दाखवण्यात आली. नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी संविधानाचे वाचन केले व आभार मानले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार गणेश शिंदे, सविता लष्करे, नायब तहसिलदार अपर्णा मोरे आदी उपस्थित होते.
प्रबोधनाच्या जागरातून महामानवास अभिवादनयानिमित्त बिंदू चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ््याला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी प्रबोधनाचा जागर केला. तर विविध संस्थांमध्येही बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रबुद्ध भारत हायस्कूल व प्राथमिक विद्यालयलक्षतीर्थ वसाहत येथील विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते रमेश रत्नाकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षस्थानी शन्मुखा अर्दाळकर होत्या. बुद्ध वंदना भिम वंदनेनंतर विद्यार्थ्यांनी जय भीम करा, दलितांचा राजा ही गौरव गीते गायली. दरम्यान शाळेतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले.विवेकानंद महाविद्यालययेथे झालेल्या कार्यक्रमात प्रा. समिक्षा फराकटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक ाकार्यचा माहोवा घेतला. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा.डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी पाहूण्यांचा परिचय करून दिला. यु. आर. हिरकुडे यांनी आभार मानले.एस. टी महामंडळविभागीय कार्यशाळा ताराबाई पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात अभियंता शिवदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी एस. बी. भातमारे, प्रतापराव तराळ, एस. एस. कुलकर्णी, एस. एस. जोशी. एस. एस. पवार उपस्थित होते.बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थापतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र मोरे व उपाध्यक्ष रंगराव मांगोलीकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. रघुनाथ मांडरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी प्रकाश पोवार, संगराव मांगोलीकर, हिंदूराव पनोरेकर, राहूण माणगांवकर, नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते.कमला महाविद्यालयताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य जे. बी. पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सचिव प्राजक्ता पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.कळंबा गर्ल्स हायस्कूलसंस्थेच्या अध्यक्षा एल. एस. सावंत यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सचिव भारती सावंत, मुख्याध्यापिका एस.ए. जाधव उपस्थित होत्या. एन.ए. देवणे यांनी संयोजन केले.इंदिरा गांधी विद्यानिकेतनसुजय देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका एम.आर. मोहिते पाटील अध्यक्षस्थानी होत्या. सुजय देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे कथन केले. डी. वाय. देसाई यांनी सुत्रसंचलन केले.विक्रम हायस्कूलशाळेचे मुख्याध्यापक बी. ए. माने यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस.ए. वायदंडे यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला. व्ही. यू. माने यांनी सुत्रसंचलन केले. पी. एस. पडवळे यांनी आभार मानले.न्यू प्राथमिक विद्यालयशाळेच्या मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्त वादविवाद, प्रश्नमंजूषा व नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तूत्वाची ओळख करून देण्यात आली.श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगसंस्थेचे चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सेवक उदय पाटील, लिपीक उदय देसाई, ए. व्ही. जाधव, डी. एस. चौगले उपस्थित होते.शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूलमुख्याध्यापिका के. एम. जबडे व शिक्षक बी. डी. सोगावी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. डी. जगदीश यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.दत्ताबाळ हायस्कूलसस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव निलेश देसाई, मुख्याध्यापक डी. व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सचिन डवंग, इंग्लिश मिडीअमच्या मुख्याध्यापिका किर्ती मिठारी उपस्थित होत्या.सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघसंघटनेचे अध्क्ष करीम मुजावर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचया प्रतिमेचे पूजन झो. यावेळी व. प. चव्हाण, दिलीप भोईटे, वसंत भोसले, शीला निटवे, विजया चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी वसंत जाधव, आनंदराव पाटील, प्रभावती कांबळे उपस्थित होत्या.राष्ट्रीय समाज पक्षमहिला आघाडी शहराध्यक्षा गिता बंदसाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, सलिम पटवेगार, संजय बोधे, चंद्रकांत खोंद्रे आदी उपस्थित होते.मिस क्लार्क हॉस्टेलज्येष्ट नागरिक विजयसिंह सुर्वे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी संचालक के.डी. कांबळे, राजेश माने, बाळासाहेब सरदेसाई उपस्थित होते.कर्मवीर इंग्लिश मिडीअम स्कूलसंस्थेतर्फे पांडूरंग कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी पार्थ मगदूम, देवयानी कांबळे, मनाली वायंगणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिीली. यावेळी अध्यक्ष डॉ. संदेश कचरे, प्राचार्य ए. के. कचरे उपस्थित होते.