कोल्हापूर : केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात स्वतंत्र लेदर व फुटवेअर धोरण करणार असल्याचे जाहीर केल्याने कोल्हापुरी चप्पल उद्योगास चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एक कोटी रुपये गुंतवणूक केल्यास त्यातून २५० ते ३०० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. वस्त्रोद्योग धोरणातून हे अधोरेखित झाल्याने लेदर उद्योगाचेही स्वतंत्र धोरण करून त्यात गुंतवणूक झाल्यास ग्रामीण रोजगारच्या संधी प्राप्त होतील असे केंद्राला वाटते. त्याचे सूतोवाच या अर्थसंकल्पात केले आहे.याबाबत नगरसेवक व कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक भूपाल शेटे म्हणाले, ‘हा हस्तकला उद्योग असून तो मजुरांवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याची किंमत जास्त होत.े म्हणून सरकारने करांतून सूट द्यावी. कर्नाटकात चामडे सरकारकडून पुरविले जाते व अनुदानही दिले जाते. त्याचा विचार झाल्यास हा उद्योग नव्याने वाढू शकेल.कोल्हापूर चप्पल निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुभाष सातपुते म्हणाले, ‘केंद्र सरकारने हे धोरण निश्चित करताना नवीन गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे. हा हस्तकला उद्योग घरगुती स्वरुपात केला जातो; परंतु करांमुळे तो परवडत नाही. म्हणून आम्हाला सर्व करांतून सवलत द्यावी. वीज नसलेली अजूनही १९ वाड्या-वस्त्याया अर्थसंकल्पात सन २०१८ पर्यंत देशातील सर्व गावे व वाड्या-वस्त्यांवर वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्णांत सन २०११ च्या जनगणनेनुसार ३२ वाड्या वस्त्यांवर अजूनही वीजपुरवठा होत नाही असे स्पष्ट झाले होते. यापूर्वीच्या सरकारने त्यासाठी ‘राजीव गांधी ऊर्जा कार्यक्रम’ म्हणून घोषित केला होता. त्याच कार्यक्रमाचे भाजपच्या सरकारने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना’ असे नामकरण केले. जिल्ह्णांतील ३२ पैकी १३ गावांतील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित १९ गावांतील कामांच्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामज्योती योजनेतून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. हा निधी ‘महावितरण’ला प्राप्त झाला असल्याने याच महिन्यापासून राहिलेल्या गावांतील विद्युतीकरणाची कामे सुरू होतील, अशी माहिती ‘महावितरण’च्या सूत्रांनी दिली.भवितव्य अंधकारमय कोल्हापूर जिल्ह्यांत सुभाषनगर परिसर, बाजारभोगाव, कळे, कांचनवाडी, लिंगनूर कापशी, मडिलगे आदी गावांत कोल्हापुरी चप्पल निर्मिती होते. साधारणत: वर्षाला सहा लाख चप्पलांची निर्मिती केली जाते. आठ हजारांवर लोक या उद्योगात आहेत. वर्षाची सरासरी उलाढाल दहा कोटींपर्यंत आहे. त्याचे आधुनिकीकरण न झाल्याने भवितव्य अंधकारमय बनले आहे.
कोल्हापुरी चप्पलला चालना मिळणार
By admin | Published: February 02, 2017 1:08 AM