कोल्हापूर, दि. 22 - अमेरिकेतील खग्रास सूर्य ग्रहणाच्या थेट प्रक्षेपणाचा मनसोक्त आनंद सोमवारी रात्री कोल्हापूरच्या खगोलप्रेमीनी लुटला.
खगोलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस विशेष पर्वणी घेऊन आला होता. गत ९९ वर्षांतील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेत दिसले. अंदाजे दोन मिनिट तीस सेकंद इतका वेळ सूर्य-चंद्राच्या पाठीमागे लपला.
शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाकडे जगभरातील खगोलप्रेमीचे लक्ष लागून राहिले होते. यापुढील खग्रास सूर्य ग्रहण २२५२ मध्ये अमेरिकेत तर कंकणाकती सूर्य ग्रहण २०१९ मध्ये भारतात कोइमतूर येथे दिसणार आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री १०.१५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत हा ग्रहण सोहळा पार पडला. ही दुर्मिळ घटना कोल्हापुरातल्या खगोल प्रेमींना बघायला मिळावी, या हेतूने कुतूहल फाउंडेशन या घटनेचे प्रोजेक्टद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. दलाल मार्केट रिलायन्स मॉलच्या पाठीमागे गाळा क्रमांक १४ या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
कुतूहल फाउंडेशनच्या आनंद आगळगावकर, सचिन जिल्हेदार, अतुल कामत यांनी याचे आयोजन केलेे. यावेळी शंभराहून अधिक खगोलप्रेमी उपस्थित होते.