शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

नाट्य कलावंतांच्या अदाकारीने कोल्हापूरकर रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 11:44 AM

महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली.

ठळक मुद्दे नाट्य कलावंतांच्या अदाकारीने कोल्हापूरकर रसिक मंत्रमुग्धमहावितरणच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर : महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली. केशवराव भोसले नाट्यगृहात महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे.महावितरणचे कोल्हापूरचे मुख्य अभियंता अनिल भोसले, पुणेचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामतीचे मुख्य अभियंता सुनील पावडे व महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता ए. बी. दडमल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्र्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर, सांगलीचे अधीक्षक अभियंता संजय साळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता (पा. आ.) मनोज विश्वासे, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुणे परिमंडलाच्या वसंत कानेटकर लिखित ‘प्रेमात सगळंच माफ’ या नाटकाने स्पर्धेला सुरुवात झाली. सुखाने चालू असलेल्या संसारात १0 वर्षांपूर्वी नवऱ्याचे आकस्मिक आलेले विवाहबाह्य संबंध एका प्रसंगातून पुढे येतात; त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो, संघर्ष होतो. अशा प्रसंगातही पत्नी पतीला समजून घेत, त्याला खंबीर साथ देत ‘प्रेमात सगळंच माफ’ असतं हे दाखवून देते. यामध्ये पत्नी मधुरा, पती डॉ. अनिरुद्ध व मुलगी सुंदर यांच्या उत्कृष्ट अभिनयाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर परिमंडलाचे शिवाजी देशमुख लिखित तुफान विनोदी ‘कार्टी नं-१’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सुरुवातीपासूनच पोट धरून हसायला लावणाऱ्या या नाटकात महाविद्यालयीन जिवनात वसतिगृहात राहणारे मित्र एका गरीब कुटुंबातून आलेल्या, प्रसंगी उपासमार सहन करणाऱ्या आपल्या मित्राला आधार देत, त्याच्या पाठीशी राहतात. यातून निखळ मैत्रीचा संदेश देण्यात आला आहे. यावेळी नाट्यरसिकांची गर्दी झाली होती.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर