कोल्हापूर : जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सोमवारी ४० डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने कोल्हापूरकर घामाघूम झाले आहेत. सकाळी आठपासूनच उकाड्यास सुरुवात होत असून येत्या आठवड्यात पारा आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाड्यास सुरुवात झाली. मार्चमध्ये तर कमाल तापमान सरासरी ३७ डिग्रीपर्यंत राहिले. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सूर्यनारायण आग ओकत आहे. सकाळी आठपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. दहा वाजता तर अंगातून घामाच्या धारा लागतात.
दुपारी बारा वाजता तर अंग भाजून निघते. दिवसभर उष्मा वाढतच जातो. किमान तापमानातही वाढ होत असल्याने सायंकाळीही कमालीचा उष्मा जाणवतो. सोमवारी किमान तापमान २३ डिग्री, तर कमाल ४० डिग्रीपर्यंत पोहोचले होते. आगामी आठवड्यात उष्मा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.असे राहील तापमान डिग्रीमध्ये...वार किमान कमाल
- मंगळवार ३९ २२
- बुधवार ४१ २२
- गुरुवार ४० २०
- शुक्रवार ४० २१
- शनिवारी ४१ २२
- रविवार ४० २१