शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

थुंकीमुक्त आणि स्वच्छ कोल्हापूरसाठी कोल्हापूरकरांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 11:12 AM

Health Kolhapur- आपल्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारातून ज्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समाजाला सांगितले अशा महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना कृतीमधून आदरांजली वाहण्यात आली. अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने यांच्यावतीने नागरिकांच्या मध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली होती.

ठळक मुद्देथुंकीमुक्त आणि स्वच्छ कोल्हापूरसाठी कोल्हापूरकरांचा निर्धारगांधी पुण्यतिथी निमित्त पदयात्रा

कोल्हापूर-आपल्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारातून ज्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समाजाला सांगितले अशा महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना कृतीमधून आदरांजली वाहण्यात आली. अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने यांच्यावतीने नागरिकांच्या मध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली होती.'थुंकीमुक्त कोल्हापूर' चळवळीमुळे आशादायी बदल घडू लागले आहेत. या प्रसंगी अनेक दुकानात थुंकीमुक्त कोल्हापूरच्या वतीने स्टिकर्स लावण्यात आली. दुकानाच्या दारात थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी अत्यंत टोकाच्या भावना व्यक्त केल्या परंतु सरकारी यंत्रणा दंडात्मक कारवाई न करता या बाबीकडे सोईस्कर दुर्लक्ष करताना दिसत असल्याची खंत सर्वच स्तरातून मांडली जात आहे.केशवराव भोसले नाट्यगृह पासून सुरू झालेली पदयात्रा मिरजकर तिकटी - बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड वरून पापाची तिकटीपापाची तिकटी येथे असणाऱ्या गांधी पुतळा परिसर येथे विसर्जित झाली. हातामध्ये जनजागृती करणारे फलक, लक्षवेधी टोप्या घालून नागरिकांनी उस्फूर्त सहभाग या पदयात्रेमध्ये नोंदवला.राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे, सागर बकरे, सुनिता मेंगाणे, नीना जोशी, ललिता गांधी, ललित गांधी, गीता हासुरकर, अश्विनी गोपूडगे, मीनाक्षी सुतार, राहुल चौधरी, दीपा शिपूरकर, बंडा पेडणेकर, अभिजित गुरव, जीवन बोडके, विद्याधर सोहनी, कपिल मुळे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, महाद्वार व्यापारी आणि रहिवासी असोसिएशनचे अशोक लोहार, संदीपराव जाधव, शामराव जोशी, पृथ्वीराज जगताप, महेश उरसाल, रमाकांत ऊरसाल, शिवनाथ पावसकर, मनोज बहिरशेठ, किरण धर्माधिकारी यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. युवराज लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या थुंकवीरांना चाप लावण्यात प्रशासन बोटचेपी भूमिका का घेते आहे असे सर्वच नागरिक विचारताना दिसताहेत. येत्या काळात कोल्हापूर स्वच्छ व निरोगी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे आंदोलनाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल.-दिपा शिपुरकर 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर