शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

कोल्हापूरचे अर्थचक्र सुरू, तीन महिन्यांनी रस्ते बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:28 AM

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार तब्बल तीन महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरातील कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल करून सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय, व्यापार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ‘पुनश्च हरिओम’ करण्यास आसुसलेल्या व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, फेरीवाले यांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बंद पडलेला व्यवसाय सुरू केला.

शहरातील अनेक दुकानदार सकाळी आठ वाजताच आपापल्या दुकानात पोहचले. तीन महिने बंद असल्यामुळे प्रथम त्यांनी दुकानांची झाडलोट सुरू केली. देव-देवतांच्या फोटोंची पूजा केली आणि बंद पडलेल्या आपल्या व्यवसायाची पुन्हा एकदा सुरवात केली. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने कोरोनाच्या काळात सुरू होती. सोमवारपासून मात्र सर्वच दुकाने सुरू झाली. कापड, भांडी, ज्वेलरी, इमिटेशन्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, लॉन्ड्री, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, साड्या व ड्रेस मटेरियल, चपल, मोबाईल शॉपी, गॅसशेगडी, पानपट्टी, चहाच्या गाड्या अशा शेकडो प्रकारची दुकाने व व्यवसाय सोमवारी सुरू झाले. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने ही दुकाने फुलून गेली. लहान-मोठे मॉल, शोरूमही सुरू झाले.

शहरातील मोठी हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम व बार मात्र सोमवारी सुरू झाले नाहीत. त्यांना पन्नास टक्के आसन क्षमता ठेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु व्यावसायिकांच्या या अपेक्षेचा भंग झाला. त्यामुळे ती बंदच राहिली. पार्सल सेवा देण्यास मात्र त्यांना परवानगी दिली आहे. मद्याची दुकाने न उघडल्यामुळे सोमवारी सर्वच दुकानाबाहेर ग्राहकांच्या चकरा वाढल्या होत्या. बंद असलेल्या मद्याच्या दुकानातून पार्सल सेवा दिली जात होती.

-नवीन उत्साह, नवीन सुरुवात

गेल्या पंधरा महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गामुळे नागरिकांना एक प्रकारे नकारात्मक वातावणाने नैराश्य, कामात शिथिलता, आर्थिक टंचाई अशा विचित्र संकटाला सामोरे जावे लागले. सोमवारचा दिवस उत्सुकता आणि नवीन उत्साह घेऊन उजाडला. हा दिवस सर्वांमधील नकारात्मकता, नैराश्य दूर सारणारा ठरला. रविवारी दिवसभर व्यवसाय सुरू होण्यास परवानगी मिळणार की नाही, याचीच चिंता अनेकांना लागून होती; पण सोमवारी सर्वांनाच माहिती कळाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसले.

-सर्वत्र गर्दीच गर्दी

खूप दिवसांनी शहरातील सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहक वर्गातही उत्साह दिसून आला. कपड्यांच्या, साड्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळाली. घडाळ्याची शोरूम, ज्वेलर्स दुकाने, सराफ बाजारातही ग्राहकांची गर्दी होती. सर्वच दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. थोड्या थोड्या नागरिकांना आत सोडले जात होते.

-खाऊगल्यासुद्धा बहरल्या

शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या खाऊगल्ल्यातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खवैय्यांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे व्यवसाय सुरू असले तरी खवैय्यांनीच पाठ फिरविल्यामुळे खाऊगल्लीत वर्दळ कमी झाली होती. मात्र सोमवार त्याला अपवाद ठरला.

-वर्दळ वाढली, रस्ते फुल्ल

कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ फारच कमी होती. दुपारी चार वाजल्यानंतर तर ही वर्दळ बंदच व्हायची. रस्ते ओस पडायचे. सगळीकडे शांतता निर्माण झालेली असायची; पण सोमवारी मात्र सर्वच रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलले. वाहनांच्या गर्दीने फुल्ल झाले. सर्वत्र एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झालेले पहायला मिळाले.

-बसस्थानके गजबजली

मध्यवर्ती बसस्थानकासह रंकाळवेश, संभजीनगर बसस्थानक तसेच केएमटीचे बस थांबे प्रवाशांच्या लगबगीने गजबजली. बाहेरगावाहून येणारे तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्यांचीही संख्या काही कमी नव्हती. केएमटी बस गाड्या, ॲटोरिक्षा ही रस्त्यावर धावत होत्या.

कोट- १.

व्यवसाय सुरू झाले, त्यामुळे बाजारपेठेला झळाली आली. आता व्यापारी, दुकानदार यांनी कोरोना संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आठ दिवसांसाठी ही परवानगी आहे. जर कोरोना रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध पुन्हा लादले जाऊ शकतात, याची जाणीव दुकानदारांनी ठेवावी.

संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स