कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उद्याच्या अंतिम सामन्यादरम्यान जगातील सर्वात मोठं स्टेडियम असणाऱ्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कोल्हापूरचे तरुण ६० वॅट क्षमतेचे ४० लेझर मैदानावर लाउन अख्ख्या जगाला लेसर शो व लाईट इफेक्टचा झगमगाट दाखवणार आहेत. यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर ४० लेझर कार्यान्वित झालेले नसल्यामुळे हा एक विक्रमच ते रचणार आहेत. या लेझर शो साठी योगेश चौधरी, अमित पाटील, रामकृष्ण वागराळे, सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रवीकुमार, गणेश तटकरे यांची टीम मैदानावर तैनात आहे.आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या अंतिम सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मैदानावर खास लेझर शो आणि लाईट इफेक्ट होतो. डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असते. डिम शो आणि ग्राफिक शोमुळे मैदानावर झगमगाट होतो. हे एक आव्हानच असते. यंदा हे आव्हान कोल्हापूरचे अमित पाटील आणि रामकृष्ण वागराळे या तरुणांनी स्वीकारले आहे.लाईटच्या व्यवसायात २०११ मध्ये पडलेल्या या तरुणांनी नवनवे तंत्रज्ञान आणले. विविध आव्हाने स्वीकारत त्यांनी जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी अयोध्या इथं दिवाळीसाठी राम मंदिर परिसरात तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिरात कोल्हापूरच्या या खास लेझर लाईट शो करण्यात आला आहे. याशिवाय दुबई येथील एका लग्न समारंभामध्ये ६० लेझर लावले होते.
जागतिक विक्रम रचणारदिल्ली येथील हेड वे क्रिएशन या कंपनीसोबत ते हा शो सादर करणार आहेत. ६० वॅट क्षमतेचे ४० लेझर मैदानावर लाउन अख्ख्या जगाला लेसर शो व लाईट इफेक्टचा झगमगाट दाखवणार आहेत. हा एक विक्रमच असणार आहे, कारण यापूर्वी इतक्या लेझरद्वारे जगभरातील कोणत्याही मैदानात शो करण्यात आलेला नाही.