शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पसंतीच्या क्रमांकातून कोल्हापूरचे ‘आरटीओ’ मालामाल

By admin | Published: June 08, 2017 6:13 PM

प्रादेशिकच्या चार विभागातून वर्षभरात १६ कोटी २६ लाख जमा

आॅनलाईन लोकमत/सचिन भोसलेकोल्हापूर, दि. 0९ : गाडी दुचाकी वा चारचाकी असो त्याला क्रमांक हवा पसंतीचाच. मग त्यासाठी जादा पैसे मोजायला लागले तरी बेहत्तर असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा हव्या त्या क्रमांकासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड येथील १९ हजार ६२७ वाहनधारकांनी यंदाच्या वर्षात १६ कोटी २६ लाख रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे १, ११११, २२२२, १२३४, १२३, ९,९९९९, ९२९२, ११५५, ७४७४, ६१८, १०,१००, १०००, ४०००, अशा एक ना अनेक पंसतीच्या क्रमांकाना अनेकांनी कधी लिलावाद्वारे तर कधी ठरविलेल्या शुल्कापेक्षा जादा पैसे मोजले आहेत. दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत अशा शुभ मुहुर्तावर अनेक नागरीक वाहन, सोने, गृह खरेदी करीत असतात. यात जादा करुन वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मग वाहन म्हटले की लकी क्रमांक हवा, मग त्यात कुणाचा ९, तर कुणाचा ५, ७, ११, तर कुणाला ७८९, ७८६ हवा असतो. मग त्यासाठीच अनेकजण ३ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शुल्क भरण्यास राजी होतात. अनेकजणांना पुर्वीच्या गाडीचा क्रमांक हवा म्हणून वाहनधारक नवीन गाडी घेताना तोच क्रमांक पाहीजे म्हणून जादा पैसे मोजतात. तर अंकशास्त्रज्ञांनी तुम्हाला अमुक एक क्रमांकच शुभ आहे आणि तोच क्रमांकही घ्या असा सल्ला देतात. तर कोणाला जन्म तारीख, तर कोणाला पत्नीच्या जन्मतारीखेचीच बेरीज हवी असते. यासह अनेकांना दादा, बॉस, राज, राम, अशा एक ना अनेक नावे तयार होणारी अक्षरे हवी असतात. म्हणून अमुक एक क्रमांकच हवा म्हणून अनेक वाहनप्रेमी आगावू सिरीज सुरु होण्यापुर्वीच ‘ जंपींग’ करुन प्रसंगी जादा शुल्क भरुन असे हवे ते पसंतीचे क्रमांक घेतात. अशा या क्रमांकाच्या प्रेमापोटी अनेकांनी गाडीच्या किंमती जवळपास पैसे भरलेले उदाहरणे आहेत. अशा या क्रमांका प्रेमापायी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय मालामाल अर्थात महसुलात वाढ होत आहे. यंदा तर केवळ १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१७ अखेर १६ कोटी २६ लाखांचा महसुल कार्यालयाकडे जमा झाला आहे. यंदा तर यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा कार्यालयाला आहे.

कुणाचा वाटा किती

कार्यालय                     वाहनधारक               महसुल  

कोल्हापूर                     ९१७७                     ७ कोटी   ४ लाख सातारा                        ३८६४                    ३ कोटी    ४१ लाख सांगली                        ५२७३                   ४ कोटी  २६ लाख कराड                           १३१३                    १ कोटी ५५ लाख                                 १९६२७                  १६ कोटी २६ लाख

चर्चा ५ कोटीच्या चारचाकीची अन् ३० लाखांच्या दुचाकीची

गेल्या महिनाभरात कोल्हापूर प्रादेशिक परिवहनकडे रोल्स राईस ही महागडी ५ कोटी रुपये किंमतीच्या गाडीची नोंदणी झाली असून गाडी मालकाने करापोटी सुमारे १ कोटी रुपये प्रादेशिककडे भरले आहेत. तर परदेशी बनावटीची बीएमडब्ल्यू ही महागडी ३० लाख रुपये किंमतीची दुचाकीचीही नोंदणी झाली आहे. या दुचाकीच्या करापोटीही सुमारे ६ लाख रुपये प्रादेशिककडे वाहनमालकाने भरले आहेत. या दोन महागड्या गाडीची नोंदणी होऊन बरेच दिवस उलटले तरी या गाडीची चर्चा मात्र, अजुन जिल्ह्यात सुरुच आहे.