शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

कंदलगावचा उदय पाटील राज्यात दुसरा ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा दबदबा;राहुल आपटे, सोनी शेट्टी, पूजा शिंदे यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:18 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ३२ जण जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ३२ जण जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी ठरले. त्यात कंदलगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) मधील शेतकरी कुटुंबातील उदय विष्णू पाटील याने राज्यात खुल्या प्रवर्गातून दुसरा क्रमांक पटकविला. स्वामी समर्थनगर, पाचगाव (ता. करवीर) येथील राहुल आपटे याने ‘एनटीबी’ प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ‘एमपीएससी’तर्फे बुधवारी रात्री आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला.

‘पीएसआय’ पदासाठी मार्च २०१७ मध्ये पूर्वपरीक्षा, जून २०१७ मध्ये मुख्य परीक्षा, तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत आॅक्टोबर २०१७ मध्ये झाली. त्यांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत कंदलगावमधील उदय पाटील याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. त्याचे प्राथमिक शिक्षक विद्यामंदिर कंदलगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण भारती विद्यापीठ प्रशाला (मोरेवाडी) येथे झाले. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमधून त्याने बी. एस्सी. (झूलॉजी) विषयातून पदवी घेतली. त्यानंतर सन २०१५ मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अभ्यासातील सातत्य, चिकाटीच्या जोरावर त्याने ‘पीएसआय’ परीक्षेत यश मिळविले. त्याचे वडील विष्णू हे शेतकरी, तर आई रंजना गृहिणी आहेत. जयसिंगपूर येथील सोनी शेट्टी हिने महिला प्रवर्गातून राज्यात तिसरा क्रमांक, तर इचलकरंजीतील पूजा शिंदे हिने ‘एसटी’ प्रवर्गातून राज्यात पाचवा क्रमांक मिळविला.

कोल्हापूर जिल्'ांतील अन्य यशस्वी उमेदवार (कंसात गाव, राज्यातील रँक ) : नीलम पाटील (सोनाळी, ता. करवीर, ओपन १८), तेजस्विनी पाटील (मंगेवाडी, ता. राधानगरी, ७१), वर्षाली चव्हाण (तळसंदे, ता. हातकणंगले, २९), अफरीन बागवान (तुरंबे, ता. राधानगरी, ९५), स्नेहल चव्हाण (कणेरीवाडी, ता. करवीर, १२०), सुप्रिया जाधव (कौलव, ता. राधानगरी, १३४), सुजाता पाटील (शिराळे तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, ८५), विश्वजित फराकटे (बोरवडे, ता. कागल, १९५), तानाजी आडसूळ (पाचगाव, ता. करवीर, २०), सचिन भिलारी (वाळवेकरवाडी, ता. पन्हाळा, १०४), अजिंक्य मोरे (उजळाईवाडी, ता. करवीर, ३३७), विनायक केसरकर (सरळी, ता. आजरा, १४६), अविनाश गवळी (निलजी, ता. गडहिंग्लज, एनटीबी-३), निखिल मगदूम (हळदी, ता. करवीर, ओपन १०५), प्रमोद पाटील (पोहाळे, ता. पन्हाळा, ३३२), हरीश पाटील (तेरवाड, ता. शिरोळ, ९), सच्चिदानंद शेलार (मंगळवार पेठ कोल्हापूर, २५१), नीलेश वाडकर (कसबा बीड, ता. करवीर, २८५), संतोष यादव (कंदलगाव, एस. सी. जनरल-५), हेमंत पवार (लाटवडे, ता. हातकणंगले, ओपन-१२१), सचिन रेडेकर (थेरगाव, ता. शाहूवाडी, १८०). या यशस्वी उमेदवारांवर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी प्रत्यक्ष भेटून, मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.मी शासकीय सेवेत कार्यरत असावे, हे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते; ते ‘पीएसआय’ परीक्षेतील यशाने सत्यात उतरल्याचा आनंद आहे. दिवसातील बारा तास अभ्यास करीत होतो. संदर्भग्रंथांचे वाचन आणि स्वत:च्या नोटस््वर भर देऊन तयारी केली. मला आई-वडिलांसह बाजीराव कळंत्रे, आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. -उदय पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस