कोल्हापूरचे राज्यावर उपकार, आम्हीही ते नाही विसरणार - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:37 PM2024-08-23T14:37:14+5:302024-08-23T14:37:26+5:30

कन्वेन्शन सेंटर लवकरच

Kolhapur's thanks to the state We will not forget it either says Deputy Chief Minister Ajit Pawar | कोल्हापूरचे राज्यावर उपकार, आम्हीही ते नाही विसरणार - अजित पवार 

कोल्हापूरचे राज्यावर उपकार, आम्हीही ते नाही विसरणार - अजित पवार 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कृषी, पर्यटन यांसह सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपाने या जिल्ह्याने सामाजिक समता, बंधुता याचा संदेश देशभर दिला आहे. या जिल्ह्याचे राज्यावर मोठे उपकार असून ते कधीही फेडता येणार नाहीत. आम्हीही ते विसरलो नसून अंबाबाई, जोतिबा मंदिर विकास आराखडा, कन्वेन्शन सेंटर यांसह विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. यापुढच्या काळातही कोल्हापूरसाठी निधी देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली.

कोल्हापुरातील तपोवन मैदानावर गुरुवारी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला. या वेळी मंत्री पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, पंचगंगेला येणाऱ्या महापुरामुळे शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांमध्ये वळविण्याची योजना आम्ही आखली आहे. यासाठीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली असून यामुळे महापुराचे संकट टळणार आहे.

प्रोत्साहन अनुदानही मिळेल

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड प्रामाणिक अन् आर्थिक शिस्तीचे आहेत. वीजबिल भरण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या मागील वीजबिलाचा विचार करू नका, त्यावर मार्ग काढू, असे आश्वासनही पवार यांनी दिले. प्रामाणिकपणे कर्जभरणा केलेल्या काही शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान प्रलंबित असले तरी तोही विषय लवकरच संपेल, असेही त्यांनी सांगितले.

बहिणींमध्ये अंतर पडू देणार नाही

पैसै काढून घेणार, पैसे देणार नाहीत अशा चुकीच्या गोष्टी विरोधकांकडून सांगितल्या जात आहेत. मात्र, कुणाच्याही खात्यातून पैसे काढणार नाही. तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होणार असून तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता भावा-बहिणींमध्ये अंतर पडू देणार नसल्याचा शब्द पवार यांनी दिला.

निवडणुका जवळ आल्याने पोटदुखी

एमपीएससीचे काही विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत. मुळात एमपीएससी हे स्वायत्त असल्याचे सांगूनही विरोधी पक्षाच्या आमदारांनीच त्यांना भडकावल्याने विद्यार्थी आंदोलन करत होते. निवडणुका जवळ आल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले असल्याचा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

Web Title: Kolhapur's thanks to the state We will not forget it either says Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.