शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

कौलगेत युवतीवर खूनी हल्ला

By admin | Published: June 26, 2017 9:51 PM

कौलगे (ता. कागल) येथे घरात घुसून महाविद्यालयीन युवतीवर तरुणाने चाकूने खूनी हल्ला केला. गळ्यावर, पाठीवर खोलवार वार झाल्याने

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. २६ -  कौलगे (ता. कागल) येथे घरात घुसून महाविद्यालयीन युवतीवर तरुणाने चाकूने खूनी हल्ला केला. गळ्यावर, पाठीवर खोलवार वार झाल्याने युवती गंभीर जखमी झाली. किशोरी जनार्दन दावणे (वय १९) असे तिचे नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून नातेवाईकांनी तिला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी मुरगुड पोलीसांनी संशयित आरोपी अनिल निवृत्ती कांबळे (वय ३९) याला अटक केली. तो मनोरुग्ण असून त्यातून त्याने हल्ला केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, किशोरी दावणे हि बारावी पास झाली आहे. नुकतेच तिने कला शाखेत पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे. आई-वडील शेती करतात. नेहमीप्रमाणे ते दूपारी शेतात गेले होते. त्यामुळे ती एकटीच घरी टीव्ही पाहत होती. घरासमोर राहणारा अनिल कांबळे हा घरात घुसूला. त्याने काही न बोलता तिच्या गळ्यावर, पाठिवर चाकूने वार केले. अचानक घडलेल्या याप्रकाराने तीने आरडाओरडा केला. यावेळी घराशेजारील लोक पळत आले. इतक्यात कांबळे याने तेथून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किशोरीला नातेवाईक व नागरिकांनी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृत्ती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संशयित कांबळे याचे गावातच सायकल पंकचर  काढण्याचे दुकान आहे. त्याने कोणत्या कारणातून हल्ला केला, हे स्पष्ट झाले नव्हते. याप्रकरणी उलट-सुलट चर्चा गावात आहे. तो मनोरुग्ण असून त्यातून त्याने हल्ला केला असण्याची शक्यता मुरगुड पोलीसांनी व्यक्त केली आहे. त्याला अटक केली असून त्याचेकडे सखोल चौकशी सुरु आहे.