शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

कोपर्डी, आरक्षण, सीमाप्रश्नासह दहा मागण्यांचे निवेदन सादर

By admin | Published: October 16, 2016 12:10 AM

सहा तरुणींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

कोल्हापूर : कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सहा महिन्यांत फाशी द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न त्वरित सोडवावा, यासह दहा मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आले. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी चोख पोलिस बंदोबस्तात संयोजन समितीने निवड केलेल्या सहा तरुणींनी हे निवेदन दिले. या मोर्चामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, हा महत्त्वाचा नियोजनाचा भाग होता. निवेदन देण्यासाठी ॠतुजा माणिक पाटील, मानसी नितीन सरनोबत, शिवानी रवींद्र सासने, कोमल संजय मिठारी, शिवानी विक्रमसिंह जाधव आणि प्रज्ञा प्रकाश भोईटे या सहा तरुणींची निवड करण्यात आली होती. सकाळी ११च्या सुमारास या तरुणींना जिल्हाधिकारी कार्यालयात आणले गेले. यानंतर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी जिल्हाधिकारी दालनामध्ये या तरुणींना चोख पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. लगेचच जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केल्यानंतर आमच्या मागण्या निवेदनात मांडल्या आहेत. त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी आमची मागणी असल्याचे या तरुणींनी सांगितले, तेव्हा तुमच्या भावना शासनापर्यंत त्वरित पोहोचवू, असे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सांगितले. त्यानंतर या तरुणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामधून बाहेर पडल्या. (प्रतिनिधी) या तरुणींनी दिले निवेदन शिवानी रवींद्र सासने रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर (न्यू कॉलेज, टीवाय. बी.कॉम.) ॠतुजा माणिक पाटील, राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर (अभियांत्रिकी दुसरे वर्ष) मानसी नितीन सरनोबत, माळी गल्ली, शिवाजी पेठ कोल्हापूर (अकरावी कॉमर्स) प्रज्ञा प्रकाश भोईटे, वडरगे रोड गडहिंग्लज (बीई) शिवानी विक्रमसिंह जाधव, न्यू शाहूपुरी कोल्हापूर (विवेकानंद कॉलेज- बी.एस्सी.) कोमल संजय मिठारी, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ (डी. डी. शिंदे कॉलेज एसवाय. बी.कॉम.) जिल्हाधिकाऱ्यांकडून आस्थेवाईकपणे चौकशी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हे सकाळी पावणेदहालाच आपल्या दालनात उपस्थित होते. त्यांच्या दालनात गेल्यानंतर सर्वांना त्यांनी बसायला सांगितले. त्यानंतर निवेदन स्वीकारले. निवेदन देणाऱ्या तरुणींसाठी पाणी आणण्यास सांगितले. त्यानंतर या तरुणींना तुम्हाला काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यांचे निवेदन ऐकून घेऊन उपस्थित महिलांनाही त्यांनी काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली आणि भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सहा महिन्यांत आरोपींना फाशी द्या. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या. अट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करणे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास पाच हजार कोटींची आर्थिक तरतूद करा. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मराठा समाजातील तरुणांना किमान कौशल्य विकास, उद्योग व नोकरी यासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी. १९ फे ब्रुवारी या एकाच दिवशी सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात यावी. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक २०१७ पूर्वी पूर्ण करावे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न त्वरित सोडवावा.