शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

विनय कोरे, महाडिक, चंद्रकांत पाटील यांच्यात खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 3:42 PM

Politics Kolhapur- भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक यांची अचानक रेसिडेन्सी क्लबमधील बंद खोलीत सुमारे तासभर बैठक झाली. विशेष म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही उपस्थित लावली होती.

ठळक मुद्देकोरे, महाडिक, चंद्रकांत पाटील यांच्यात खलबतेसुमारे तासभर बंद खोलीत चर्चा; अनौपचारिक बैठक असल्याचा दावा

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक यांची अचानक रेसिडेन्सी क्लबमधील बंद खोलीत सुमारे तासभर बैठक झाली. विशेष म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही उपस्थित लावली होती. बैठकीनंतर त्यांना विचारले असता ही अनौपचारिक बैठक असल्याचे म्हटले. तोंडावर असणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमवर झालेली ही बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्वबळावर लढणार आहे तर भाजप, ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य शक्ती हे तीन पक्ष निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे, असे असतानाच सकाळी ११ च्या सुमारास रेसिडेन्सी क्लब येथे या तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांची बंद खोलीत बैठक शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.काही दिवसांपासून आमदार महादेव महाडिक राजकारणापासून अलिप्त होते. रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी आवर्जुन हजेरी लावल्यामुळे ते पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे दिसून आले. पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता मात्र, त्यांनी याचे खंडन केले. ही योगायोगाने भेट झाली असून महापालिकेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.महाडिकांना सगळे चालतातबैठकीनंतर महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक बाहेर आल्यानंतर एक कार्यकर्ता त्यांच्यासमोर आला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी त्याला पाहिले असता तो म्हणाला, साहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे. यावर महाडिक म्हणाले, महाडिकांना सगळे चालतात. कोणाचेही वावडे नाही. पत्रकारांनी त्यांना बैठकीविषयी विचारले असता पृथ्वीराज धनंजय महाडिक यांनी घरगुती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भेटल्याचे सांगितले.महापालिकेसंबंधात चर्चा नाही : चंद्रकांत पाटीलचंद्रकांत पाटील यांना बैठकीतील माहितीविषयी विचारले असता ते म्हणाले, मी नेहमीच कोल्हापुरात आल्यानंतर विविध क्षेत्रांतील लोकांच्या भेटी घेतो. आज वेळ कमी असल्यामुळे राजकारणातील या नेत्यांना एकत्र भेटण्याचा योग आला अनौपचारिक गप्पा केल्या. महापालिकेच्या निवडणुकीला अजून अवधी असल्याने यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकVinay Koreविनय कोरेkolhapurकोल्हापूर