उदगाव : गेल्या चार दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील उमळवाड, कोथळी परिसरात लांडग्यांनी धुमाकूळ घातला आहे. कोथळी येथे शनिवारी पहाटे लांडग्याने केलेल्या हल्ल्यात संजय बिरू पुजारी यांच्या १२ शेळ्या ठार झाल्या. यामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाले. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. याबाबत माहिती अशी, कोथळी येथील तायाप्पा धनगर यांच्या शेतात संजय पुजारी यांनी शेळ्या बसविल्या होत्या. शनिवारी पहाटे लांडग्याने शेळ्यांच्या कळपात घुसून सुमारे १२ शेळ्या ठार केल्या आहेत. दरम्यान, कोथळी लगतच असलेल्या उमळवाड गावातही सोमवारी लांडग्याने हल्ला करून ठोंबरे कुटुंबीयांच्या सात शेळ्या ठार केल्या होत्या. या हल्ल्यात चार शेळ््या जखमीही झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच कोथळीत लांडग्याने पुन्हा हल्ला करून १२ शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे मेंढपाळ, जनावरे पाळणारे, शेतकरी धास्तावले आहेत. कोथळीतील हल्ल्याच्या घटनास्थळी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, माजी उपसरपंच संजय नांदणे, अशोक पुजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळातून होत आहे.
कोथळीत लांडग्याकडून १२ शेळ्या ठार
By admin | Published: April 24, 2017 1:06 AM