गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे स्वतंत्र जागेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले. गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संस्थेने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
या ठिकाणी १० ऑक्सिजनबेड आणि पाच व्हेटिंलेटर बेडची सुविधा करण्यात आली आहे. तसेच चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित अनुभवी कर्मचारी कार्यरत असणार आहेत, अशी संस्थेचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.
लाकूरवाडी ग्रामसेविकेची बदली
करा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे
गडहिंग्लज : लाकूरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामसेविकेची ३० एप्रिलपूर्वी बदली करा, अन्यथा २ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पंचायत समितीच्या सभापतींना निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, लाकूरवाडीच्या ग्रामसेविका मंगल मर्णहोळकर- मेणसे या दैनंदिन कामात सदस्यांना सहकार्य करीत नाहीत. उद्धट उत्तरे देतात, कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. निवेदनावर सरपंच सुजाता राजगोळकर, उपसरपंच सुरेश पवार, सदस्य आप्पाजी राजगोळकर, लक्ष्मण जाधव, माधुरी कोळसेकर, आनंदी रेडेकर, अनिता निटूरकर, आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.