शित्तूर-वारुण : कोरोनाबरोबर शैक्षणिक, व्यावसायिक, नोकरी, शेती, आरोग्य आदी विषयांवरील मार्गदर्शनासाठी गेल्या तीन महिन्यांपासून विनामूल्य सुरू केलेले शित्तूर-वारुण कोविड समुपदेशन केंद्र सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. या केंद्राकडून आजअखेर ४८ जणांना प्रत्यक्षात तर फोनवरून सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील २० लोकांना समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी बी. टी. पाटील यांनी आण्णा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शित्तूर-वारुण येथील कोविड केअर समुपदेशन केंद्रातून अनेकांना समुपदेशन केल्याने तज्ञांकडून या केंद्राचे कौतुक होत आहे.