कोल्हापूर : शिवाजी पेठेतील नागरिकांसाठी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनची सुरुवात त्यांनी फिरंगाई प्रभाग क्रमांक ४७ मधून केली. त्यांनी हा प्रभाग कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
या प्रभागातील फिरंगाई मंदिरामध्ये त्यांनी दि. २१ आणि २२ मे रोजी मोफत स्वॅॅब आणि एचआरसीटी तपासणीचा उपक्रम राबविला. कोरोनाबाधित रुग्णांना बेडची सुविधा, तर होम क्वारंटाइन असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचाराची सोय करून देण्याची ग्वाही शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिली. आपला प्रभाग आपले कुटुंब समजून प्रभाग क्रमांक ४७ हा कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आणि कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा क्रमांक (९९७०७११६१७) हा असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनावरील औषधे ही तज्ज्ञ डॉक्टर्स आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूर्णपणे मोफत, त्वरित उपलब्ध करून दिली जातील. आवश्यक असल्यास रुग्णांची एचआरसीटी तपासणी विनाशुल्क करून दिली जाईल, असे माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी सांगितले.
फोटो (२४०५२०२१-कोल-शिवाजीपेठ कोविड हेल्पलाईन) : कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील नागरिकांसाठी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी फिरंगाई मंदिर येथे मोफत स्वॅॅब आणि एचआरसीटी तपासणीचा उपक्रम राबविला.
===Photopath===
240521\24kol_12_24052021_5.jpg
===Caption===
फोटो (२४०५२०२१-कोल-शिवाजीपेठ कोविड हेल्पलाईन) : कोल्हापुरातील शिवाजीपेठेतील नागरिकांसाठी फिरंगाई मंदिर येथे मोफत स्वॅॅब आणि एचआरसिटी तपासणीचा उपक्रम राबविला.