शिरोळ : लॉकडाऊनच्या नवीन आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील विक्रेत्यांनी कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील विक्रेत्यांनी ग्रामीण रुग्णालयात त्वरित लसीकरण करून घ्यावे, तर ४५ वर्षे पेक्षा कमी असेल तर अशा विक्रेत्यांनी स्वॅब तपासणी करून घेण्याचे आदेश शिरोळ नगरपालिकेने दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शिरोळ नगरपालिकेने उपाययोजना कडक केल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील विक्रेत्यांची कोविड टेस्ट बंधनकारक केली आहे. ४५ वर्षांवरील विक्रेत्यांनी लसीकरण, तर ४५ वर्षांखालील विक्रेत्यांनी स्वॅब तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अजूनदेखील संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कायम आहे. त्यामुळे मास्कचा वापर करून कोरोनाच्या नियमांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
चौकट -
विक्रेत्यांची धावपळ
आज, सोमवारपासून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने बंद करणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे कोविड टेस्ट करून घेण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली आहे.