उदगाव : कोथळी (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी गतवर्षी पक्षीय गट-तट विसरून लोकवर्गणीतून कोणत्याही शासकीय मदतीविना २० बेडचे सेंटर उभे केले होते. सद्यस्थितीत गावात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने हे बंद केलेले कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला.
यावेळी पं. स. सदस्य राजगोंडा पाटील म्हणाले, कोथळी येथे लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या कोविड सेंटरमुळे कोथळीच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळून उपचार मिळाले होते. त्याचा फायदा गावातील रुग्णांनाच होत असल्याने रुग्णसंख्या कमी होईल.
यावेळी माजी उपसरपंच संजय नांदणे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक आहे.
दरम्यान, या सेंटरसाठी कोथळी ग्रा.पं.कडून सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन सरपंच वृषभ पाटील यांनी दिले.
यावेळी उपसरपंच आकाराम धनगर, ग्रामसेवक सी. एम. केंबळे, बाहुबली ईसराना, दिलीप मगदूम, श्रीकांत अकिवाटे, अनमोल करे, डॉ. संतोष पाटील, डॉ. दिगंबर नांद्रे यांच्यासह कोरोना समिती सदस्य उपस्थित होते.
फोटो - २३०४२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - कोथळी (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी राजगोंडा पाटील, वृषभ पाटील, संजय नांदणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.