शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

VIDEO : 'कोवाड'ची बाजारपेठ चार दिवस पाण्यात!, 2 कोटींची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 3:06 PM

पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे.

- राम मगदूम 

गडहिंग्लज : कोवाड (ता.चंदगड) येथील संपूर्ण बाजारपेठ चार दिवसांपासून पाण्यात आहे. त्यामुळे सुमारे 2 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेकडो नागरिक ताम्रपर्णी नदीच्या महापूराने वेढलेल्या घरात अडकले आहेत.

ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेले 'कोवाड'गाव स्वामीकार रणजीत देसाई यांच्यामुळे सर्वत्र परिचित झाले. ताम्रपर्णी नदीच्या पलीकडे बेळगाव मार्गावरील किणी गावच्या हद्दीत आणि अलीकडे पश्चिम बाजूच्या निट्टूर मार्गावर काही व्यापाऱ्यांनी शेतवडीत घरे बांधली आहेत. त्यांनी तळमजल्यावर दुकाने आणि वरील मजल्यावर निवासाची सोय केली आहे. 

मात्र, शनिवारी नदी पात्राबाहेर पडलेले पाणी शेतवडीतील या दुकानातही शिरले असून वरच्या मजल्यावरील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यापैकी १५ महिला व १६ पुरुष मिळून ३१ जणांना आणि एका कुत्र्याला सोमवारी (दि.5) गडहिंग्लज नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने यांत्रिक बोटीने सुरक्षित ठिकाणी हलविले. परंतु, अजूनही शेकडो नागरिक घरातच अडकले आहेत.पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

भांड्याची केली डोली..! गडहिंग्लज विभागात केवळ गडहिंग्लज नगरपालिकेकडेच एकच यांत्रिक बोट उपलब्ध आहे. परंतु, ती देखील गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी नदीच्या महापूरात अडकलेल्यांच्या बचाव मोहिमेत व्यस्त राहिल्याने कोवाडच्या काही धाडसी तरूणांनी मोठे भांडे दोरखंडात  अडकून त्यातून एक महिला व लहान मुलाला पुराच्या पाण्यातून सुखरूप सुरक्षित स्थळी हलविले. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMaharashtraमहाराष्ट्रfloodपूरRainपाऊस