शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

समाजकारण करणारे कोल्हापुरी ग्रुप--- स्पॉट लाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:35 PM

केवळ मनोरंजनासाठी असंख्य ग्रुप असतात, व्हॉटसअपमुळे तर असे ग्रुप पैशाला पासरी झाले आहेत. परंतु, मनापासून काम करणारे ग्रुप लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातही असे असंख्य ग्रुप आहेत, की जे प्रसिद्धीपासून दूर राहत स्वत: आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेप्रमाणे काम करीत असतात. अशाच काही ग्रुपचा परिचय करून यावेळच्या स्पॉटलाईटमध्ये....

केवळ मनोरंजनासाठी असंख्य ग्रुप असतात, व्हॉटसअपमुळे तर असे ग्रुप पैशाला पासरी झाले आहेत. परंतु, मनापासून काम करणारे ग्रुप लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातही असे असंख्य ग्रुप आहेत, की जे प्रसिद्धीपासून दूर राहत स्वत: आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेप्रमाणे काम करीत असतात. अशाच काही ग्रुपचा परिचय करून यावेळच्या स्पॉटलाईटमध्ये....आम्ही काळम्मावाडीकरल्हापूर गावची कोणतीही समस्या असू देत, ती आम्ही काळम्मावाडीकर गु्रपवर पोस्ट झाली की, त्या पोस्टवर विचारमंथन तर होतेच, व त्याचे निराकरणही. गेल्या दोन वर्षांत या गु्रपच्यामाध्यमातून शाळेसाठी सुरक्षा भिंत, शाळेसाठी वीज पुरवठा, ङ्कमंदिराची रंगरंगोटी, स्वच्छतामोहीमङ्क, ङ्कमहिलांमध्ये आरोग्याविषयक जागृती, व्याख्यानाला, गुणवंतांचा सत्कार, पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतिचे जतन अशा अनेक शैक्षणिक, सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.या गु्रपचे ङ्कमार्गदर्शक सुप्रसिद्ध नाट्यकार, लेखक व काळम्मावाडीचे सुपुत्र सुनील माने आहेत. त्यांनी गावाकडच्या तरुणांना घेऊन जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात रंगभूमी गाजविली. आता गावासाठी परिवर्तनाची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने गावातील युवक व कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये कामानिमित्त स्थायीक झालेल्या गावकऱ्यांना व्हाट्स गु्रपच्यामाध्यमातून एकत्र जोडले. ९ एप्रिल २०१७ रोजी आम्ही काळमवाडीकर नावाने हा व्हाट्स अ‍ॅप गु्रप सुरू केला. या गु्रपच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागृतीसाठी व्याख्यान, स्वच्छता ङ्कमोहीमङ्क आदी अनेक उपक्रमङ्कचालविले जातात.२० वर्षांनंतर शाळा प्रकाशमानविद्यामंदिर काळम्मावाडी शाळेत गेली वीस वर्षांपासून वीज नव्हती. दोन वर्षांपासून वीज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण ठेव रक्कमङ्क(डिपाजिट) भरली न गेल्यामुळे वीज सुरू होत नव्हती. गु्रपच्यावतीने काही युवक वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना भेटले व विशेष निधी उपलब्ध झाला. गेल्या महिन्यातच शाळेत वीज पूरवठा नियमित सुरू झाला आहे.आर्थिक ङ्कमदतीचा हातलोकवर्गणीतून शाळेच्या सभोवार संरक्षण भिंत उभी करण्यात आली. काळम्मादेवीच्या मंदिराच्या रंगरंगोटीसाठी गु्रपच्या माध्यातून आर्थिक ङ्कमदतीचे आवाहन करण्यात आले व आवश्यक रक्कम उभी राहिली.पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतीचे जतनगु्रपच्यावतीने गावच्या यात्रे दिवशी दहावी, बारावी, पदविका, पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. गेल्यावर्षी वाचनसंस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने यशस्वी मान्यवरांची चरित्रात्मक पुस्तके भेट देण्यात आली. यावर्षी पर्यावरण संवर्धनसाठी फळांची रोपे देण्यात आली. याचबरोबर गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत फराळे ग्रापंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्य, सरपंच यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.राहुल मंडलिकचे शौर्यअकरावीत शिकणाºया राहुल मंडलिक यांने स्वत:चा जीव धोक्यात घालून कॅनॉलमध्ये बुडणाºया एक ङ्कमुलास वाचविले. त्याच्या या शौर्याचे गु्रपच्यावतीने विशेष कौतुक करण्यात आले.उद्देशगावातील व गावाबाहेरील गावकºयांना जोडणे, चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करणे, गावातील घटनांची ङ्कमाहिती पाठविणे, गुणवंतांचे कौतुक करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक, नोकरीसाठी ङ्कमार्गदर्शन करणे, सामाजिक कार्यासाठी एकजुट होणे.----आम्ही काळम्मावाडीकर गु्रप पूर्णत: अराजकीय असून या गु्रपच्या माध्यमातून डिजिटल शाळा, करिअर मार्गदर्शन, योगा प्रशिक्षिण, आदी अनेक कार्यक्रम सुरू करण्याचा मानस आहे.- सुनील महाडिक, अ‍ॅडमिन, आम्ही काळम्मावाडीकर---स्मृतिगंध लिसनर्स क्लबस्मृतिगंध लिसनर्स क्लब हा गाणे कसे ऐकावे याचा वस्तुपाठ घालून देणारा आगळावेगळा ग्रुप कोल्हापुरात २000 सालापासून कार्यरत आहे. संगीतवेडे प्रा. श्री. ज. कालगावकर यांनी या ग्रुपची स्थापना केली. अठरा वर्षांच्या कालावधीत ८१ कार्यक्रम सादर केले गेले आहेत. अलिकडेच ३0 जून २0१८ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक पैलूंवर ८१ वा कार्यक्रम कोल्हापुरात झाला. दोनशे-अडीचशे सभासद असले तरी कार्यक्रमाला चारशेच्या आसपास रसिक उपस्थित असतात. हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असतो.गाणे कसे ऐकावे याचा वस्तूपाठच स्मृतिगंध लिसनर्समार्फत मिळतो, असे श्रोत्यांचे अभिप्राय आहेत. एक प्रकारे गाण्यांचे रसग्रहण म्हणजे काय, हेच या कार्यक्रमातून सांगितले जाते. नेहमी ऐकत असलेले गाणे इथे ऐकताना नवेच वाटते. सुरैय्याच्या निधनानंतर तिला श्रद्धांजली म्हणून भारतात झालेला एकमेव कार्यक्रम स्मृतिगंधचा होता. प्रत्येक कार्यक्रमात एक किंवा दोन तरी दुर्मीळ व बाहेर कुठेही ऐकायला न मिळणारी गाणी असतात. स्मृतिगंधमुळेच श्रोत्यांना गोहरजान, वझेबुवा, वहिदनबाई असे काळाच्या उदरात लुप्त झालेले आवाज ऐकता आले आहेत. प्रत्यक्ष संगीतकार नौशाद, गंगुबाई हनगल, आदींनी स्मृतिगंधच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. प्रभाकर तांबट, धनंजय कुरणे यांच्या प्रोत्साहनाने हे कार्यक्रम सुरू आहेत. कालगावकर यांच्या संग्रहात ४५00 रेकॉर्डस, सहा मेकॉनिकल तर ६५ इलेक्ट्रिक ग्रामोफोनचा दुर्मीळ संग्रह आहे. गाण्यांचे रसग्रहण, गाणे किती वेळाचे, सिनेमातील प्रसंग, गाण्यांच्या शब्दांविषयी माहिती, असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते.--‘अभिआस’ : वाचनसंस्कृतीची जोपासनाशहर असो की गांव, चार-पाच बायका एकत्र आल्या की त्यांच्यामध्ये सांसारिक अडीअडचणींची एकतर चर्चा होते किंवा साड्या व दागिन्यांवर तरी. त्यामुळे बायकांनी एवढ्याच मर्यादित विश्वात अडकू नये यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीला पाटील यांच्या पुढाकाराने १९८५ च्या सुमारास कोल्हापुरात ‘अभिआस’ गु्रपची स्थापना झाली. शालेय शिक्षणातील वेगळेपणाची आस म्हणून सृजन आनंद शाळा सुरू झाली तसाच हा देखील प्रयोग. त्यामुळे त्याच्या नावांतही वेगळेपण. ‘अभि-आस’ म्हणजे सतत नावीन्याची आस. या गु्रपच्या सुमारे ४५ महिला सदस्या आहेत. महिन्यांतून एकदा एका सदस्याच्या घरी त्या एकत्र येतात. एका चांगल्या पुस्तकाचे वाचन व त्या पुस्तकात लेखकांने काय विचार मांडला आहे याची एक सदस्या मांडणी करते. त्यावर मग सर्वजणी मिळून चर्चा करतात. सुमारे तासभर हा बौद्धिक उपक्रम चालतो. त्यातून जगात काय चालले आहे याची माहिती मिळते. ज्ञानात नवी भर पडते. अनेकदा एखाद्या चांगल्या पुस्तकाचे आपण नुसते नाव ऐकतो, परंतु ते वाचायला जमत नाही. अशा पुस्तकांबद्दल, त्यातील विचारांबद्दल या उपक्रमामुळे नक्कीच अवगत होतो. महिलांनी वाचले पाहिजे, स्वत: विचार करायला शिकले पाहिजे व स्वत:ची मते मांडायला शिकले पाहिजे असा या ग्रुपचा मुख्य हेतू. त्यातूनच महिलांच्या जीवनाची क्षितीजे रुंदावायला मदत होईल असा लिलाताईंचा प्रयत्न होता. तो नक्कीच सफल होत आहे. विशेष म्हणजे या बैठकीवेळी व त्यानंतरही कधीच कोणीही सदस्या कौटुंबिक प्रश्नांची चर्चा करत नाहीत. वैचारिक चर्चेचा ठेवाच घेऊन त्या घरी परतात, नव्या पुस्तकाची ‘आस’ घेऊन..!---‘आयर्न मॅन’ घडविणारा क्लबमैदानी खेळांना प्रोत्साहन देणाºया कोल्हापूर स्पोर्टस् क्लबने अल्पवधीतच आपली ओळख ‘आयर्न मॅन घडविणारा क्लब’ अशी निर्माण केली आहे. स्थापनेनंतर क्लबने आॅक्टोबर २०१७ मध्ये जलतरण, सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश असणारी ‘ट्रॉयथॅलॉन’ स्पर्धा घेतली. त्यासह विविध मैदानी खेळांमध्ये खेळाडूंना होणारी दुखापत व त्यावरील उपचार यावरील चर्चासत्र घेतले. शारीरिक क्षमतेचा कस लागणाºया ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत कोल्हापूरचा ठसा उमटविण्यासाठी क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर आणि इचलकरंजीतील १७ जणांनी तयारी करण्याचे ठरविले. त्यांनी जुलै २०१७ मध्ये ‘आयर्न मॅन आॅस्ट्रिया’साठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी दहा महिने कसून सराव केला. त्याच्या जोरावर आॅस्ट्रियातील (युरोप) केलगनफर्ट येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. दरम्यान, या क्लबबाबत सचिव उदय पाटील यांनी सांगितले की, मोबाईल आणि सोशल मीडियावर मग्न होणाºया तरुणाई आणि लहान मुलांना मैदानी खेळांकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने जानेवारी २०१७ मध्ये कोल्हापूर स्पोर्टस् क्लबची स्थापना झाली. यावर्षी क्लबचे १५ जण आयर्न मॅन ठरले. पुढील वर्षी आॅस्ट्रिया येथे होणाºया स्पर्धेसाठी १४, तर जर्मनीमधील स्पर्धेकरिता सहा जणांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी सरावाची सुरुवात झाली आहे. 

लोकविचार मंचची धडपडसामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या भावनेला तरुणाईच्या मनातून प्रेरणा मिळते तेव्हाच सामाजिक कामाची कृतिशीलता वाढीस लागते. यासाठी काही अवधी लागतो; पण सामाजिक भावनेतून निर्माण झालेला एकोपा स्वयंपूर्ण गाव घडविण्यासाठी कारणीभूत ठरतो. असंच पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील लोक विचार मंचचे कार्यकर्ते आपला गाव ‘स्वयंपूर्ण’ घडविण्याच्या ध्यासाने गाव सोईच्या सामाजिक कामासाठी गटतट विसरून एकवटतात; त्यामुळे या एकीच्या बळामुळे त्यांच्या कामात लोकसहभाग रुंदावतोय हे नक्की!गणेशोत्सव काळात पाणी प्रदूषणाचे वाढते प्रमाण गावातील तरुणाईला बोचत होते. म्हणून पाच वर्षांपूर्वी गावातील तरुणाई

गुणवत्तेसाठी धडपडणारे गुरुजी ग्रुपशाहूवाडीच्या दुर्गम भागातील आर्थिक दुर्बल व गुणीजणांच्या गुणवत्तेसाठी विधायक उपक्रम राबवणारा गुरुजींचा ग्रुप म्हणून शैक्षणिक व्यासपीठ दीड दशकापासून समाजभान जपत आहेत. वहीपेन, दप्तर ते आरोग्य कीट, दिवाळीचा फराळ तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा सराव, गुणगौरव व पालकांना मार्गदर्शन करणारे सातत्य लोकसहभागाच्या पाठबळावर राखल्याचे संस्थापक विनायक हिरवे यांनी स्पष्ट केले.शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी, नवोदय परीक्षा पूर्व तयारी, प्रज्ञा शोध परीक्षा घेवून त्यातील गुणवंतांना निवासी मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला जातोे. दरवर्षी दोन हजारांवर विद्यार्थी लाभ घेतात. दहावी व बारावीतील २५० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.दोन वर्षात २१०० मुलांच्या कुटुंबात दिवाळी फराळाची भेट तर १५० मुलांना हेल्थ कीट दिले आहे. व्यक्तीमत्व विकास शिबिर, निबंध, वक्तृत्व, रंगभरण या स्पर्धा, बाजीप्रभू टॅलेंट सर्च, रक्तदान शिबिर,यांचे दरवर्षी आयोजन केले जाते. लातूर येथील एड्स जागृती करणाऱ्या संस्थेला गतवर्षी सव्वा लाखाचा निधी सुपूर्त केल्याचे अध्यक्ष एम.आर पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या मे महिन्यात छत्रपती शाहू महाराजांनी शाहू संस्थेच्या माध्यमातूनएक लाखाचा रोख निधी एकामुलीस शैक्षणिक कार्यास देऊकेला. गुणवत्तेची ज्योत प्रज्वलित करणारा हा ग्रुप आशेचा किरण ठरला आहे.हातात हात आणि सच्ची साथ, युथ फॉर होपशायनिंगसाठी नव्हे, तर हातात हात आणि सच्ची साथ देऊन भुकेलेल्याला अन्न.... अनाथांना साथ... वंचितांना प्रेम.... दु:खी जीवाला आनंद... हे ब्रीद वाक्य घेऊन ३६५ दिवस फक्त समाजसेवा आणि समाजसेवा म्हणून काम करणारा ग्रुप म्हणजे कोल्हापूर युथ फॉर होप होय.सेवाभावी व्यक्ती, सामाजिक कार्य करणाºया काही संस्थांनी एकजुटीने सामाजिक बांधीलकीच्या भावनेने या ग्रुपची स्थापना केली. ३७० वर सदस्य नोंदणी झाल्याने, ग्रुपने कामाची चार प्रकारांत विभागणी केली आहे. यामध्येहेल्प कोल्हापूर : अनाथ मुले, शाळाबाह्य मुले, दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील मुले, बालकामगार, वृद्ध, मनोरुग्ण, वृद्ध वेश्या, तृतीयपंथींठी योजना आणि उपक्रम. लव्ह कोल्हापूर : पारंपरिक कलागुणांची जपणूक, ऐतिहासिक स्थळांचे रक्षण व संवर्धन, बकाल व विद्रुप जागांचे सुशोभीकरण शैक्षणिक व्याख्याने उपक्रम आदी.सेव्ह कोल्हापूर : प्रदूषण मुक्ती, आपत्ती व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीला चालना, जातीय सलोखा प्रस्थापित करणे आदी.सेफ कोल्हापूर : स्त्री सन्मान, वाहतूक नियम पालन प्रबोधन, अल्पवयीन मुलांचे वाहनाबाबतीत प्रबोधन, सॅनिटरी पॅड वाटप.फूड कोल्हापूर : भुकेलेल्या व्यक्तींपर्यंत ३६५ दिवस अन्न पोहोचवणे. सागर बगाडे, अकिल सय्यद, मंजिरी देवन्नावर, कविता मोदी, झकी मुल्ला, स्मिता सावंत, राहुल गोंदिल, कृष्णात कांबळे, अमर जाधव, आदी यशस्वी करत आहेत.

प्रत्येकाच्या मनात एक सामाजिक जाणीव जागृती व्हावी, यासाठी या ग्रुपची स्थापना केली आहे. आपल्या संचितातून गरीब व गरजू वंचित घटकांना मदत करण्यातच आम्हा सदस्यांना समाधान मिळते.- सागर बगाडे, ग्रुपचे प्रमुख( स्पॉटलाईट या विशेष सदरसाठी विश्वास पाटील, संदीप आडनाईक, प्रदीप शिंदे,, राजेंद्र लाड, सरदार चौगुले यांनी लिखाण केले.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocialसामाजिक