शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

क्रांती दिन विशेष: शरीरात सुया टोचल्या, जीभ हासडली पण तोंड नाही उघडले, कोल्हापुरातील निवृत्ती आडूरकरांनी देशासाठी रक्त सांडले

By संदीप आडनाईक | Published: August 09, 2023 12:57 PM

कोल्हापूरकरांनी चौकाला, रस्त्यालाही दिले नाव

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यात पुढाकार घेणाऱ्या शहरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती आडूरकर (सुतार) हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झाले. अमानुष अत्याचारात जिवाचे मोल देऊन सहकाऱ्यांचे नाव इंग्रजांना न सांगणाऱ्या आडूरकर यांचे समर्पण मोठे आहे. त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पेठेतील चौकाला तसेच त्यांचे घर असलेल्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आज क्रांतिदिनी आणि स्वातंत्र्यदिनी या हुतात्म्याला आदरांजली वाहिली जाते.ब्रिटिश सैनिकांच्या पन्हाळा येथील छावणीवर एप्रिल १९३७ मध्ये बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न काही क्रांतिकारकांनी केला. त्यावेळी पेठेत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या निवृत्ती आडूरकर यांनी स्फोट घडविण्याची जबाबदारी पूर्णत्वास नेली. प्रजा परिषदेचे नेते भाई माधवराव बागल यांची शिवाजी पेठेतील सभा उधळून लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आडूरकरांनी हाणून पाडला.१० ऑक्टोबर १९४२ मध्ये फेरीस मार्केटसमोरील गव्हर्नर सर वेलस्ली विल्सनचा पुतळा विद्रूप करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी १६ महिन्यांचा तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. मात्र, पन्हाळा बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचा सुगावा जेव्हा पोलिसांना लागला तेव्हा त्यांचा तुरुंगात अमानुष छळ करण्यात आला.

हातपाय पकडून फरशीवर आपटलेशरीरात सुया, दाभणे टोचून शरीर काळेनिळे केले. हातपाय पकडून चार पोलिसांनी त्यांना फरशीवर आपटले होते. माहिती मिळवण्यासाठी सांडशीने त्यांची जीभ हासडली होती; पण त्यांनी एका शब्दाने कोणाचेही नाव घेतले नाही. अतिरक्तस्रावाने प्रकृती गंभीर बनली होती. तुरुंगातच मृत्यू झाल्यास उद्रेक होईल, म्हणून इंग्रजांनी ७ जुलै १९४३ या दिवशी सरकारी रुग्णालयात दाखल केले.

९ ऑगस्टलाच मृत्यूदरवर्षी ९ ऑगस्टला मोठा मोर्चा काढण्याचा त्यांचा आग्रह असायचा; परंतु इंग्रजांनी १४४ कलम लागू करून जमावबंदी करून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. ३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि ९ ऑगस्ट १९४३ या दिवशीच पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेलाही जमावबंदी लागू केली होती; पण ती झुगारून शिवाजी पेठेतून भव्य अंत्ययात्रा निघाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर