थायलंड चँग ट्रॅक्टर्स थायलंडच्या संयुक्त विद्यमाने ऊस हार्वेस्टर मशीनची तोडणी प्रात्यक्षिक कसबा बोरगाव (ता. पन्हाळा) येथील नरके कँम्प येथील शेतामध्ये संदीप नरके, तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी अँग्रीमेक अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुनील शेळके व तुषार शेळके आणखीन नवीन तंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीने कटिबद्ध असून, यामुळे भारतीय कृषी उद्योगात क्रांती घडून येईल. कृषी - चँग हार्वेस्टर्स केएडब्ल्यू ग्रुप इंडिया (कोल्हापूर ऑटो वर्क्स) आणि चँग ट्रॅक्टर्स, थायलंड यांच्यात संयुक्त सह्योग आहे. ६० वर्षांहून अधिक वर्षांच्या उत्पादन अनुभवासह, दोन्ही कंपन्यांनी शेतकरी आणि ग्राहकांना जागतिक स्तरावर कृषी हार्वेस्टिंग उपकरणे आणि यंत्रसामग्री पुरविण्यासाठी हातमिळवणी केली असून, केएडब्ल्यू ग्रुप अनेक वर्षे ग्राहकभिमुख दृष्टिकोनाचा अनुभव घेऊन भारतातील कोल्हापुरातील उत्पादन, ऑटोमोटिव्ह, निर्यात, लीजिंग, शेतीमध्ये अतुलनीय कौशल्य मिळविले आहे.
कृषी-चँग हार्वेस्टर्स सर्व ग्राहकांना परवडणारी, वापरण्यास सुलभ आणि अत्याधुनिक कृषी यंत्रणा जागतिक पातळीवर आमच्या चॅनेल भागीदार आणि थायलंड आणि भारतातील उत्पादन असेंब्ली सुविधांसह वितरकांद्वारे उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध असल्याचे तुषार शेळके यांनी सांगितले.
फोटो : कसबा बोरगाव (ता. पन्हाळा) येथील नरके कँम्प येथे शेतकऱ्यांना कृषिचँग विषयी माहिती देण्यात आली. यावेळी थायलंड अर्थ सल्लागार चेतन नरके, संदीप नरके, तुषार शेळके, सुनील शेळके.