प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिरपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात आज पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रातून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात गेल्या चोवीस तासात ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिरपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.आज नृसिंहवाडी परिसरात पावसाने थोडी उघडीप दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होत आहे. नृसिंहवाडी गावच्या तीनही बाजूला नदी असल्याने पाण्याच्या पुराने गावाला वेढण्यास सुरवात केली आहे.
येथील बाबर प्लॉट मधील रामनगर येथील काही भागातील घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तेथील लोक स्थलांतरीत होण्याच्या तयारीत आहेत. वाढलेले नदीचे पाणी दत्त देव संस्थांचे प्रसादालय, धार्मिक विधीगृह येथे शिरले असून प.प.टेंबे स्वामी महाराज नवे देवळा जवळ नदीचे पाणी आले आहे.
मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवण्यात आली असून तेथे त्रिकाळ पुजा चालू आहे.