नेहमी मुख्य बाजारपेठ रस्त्यावर भरणाऱ्या बाजारातील गर्दी नियंत्रित राहत नसल्याने रविवारचा आठवडी बाजार न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे; तर बुधवारचा बाजार गावातील प्रमुख चौकामध्ये विखरून भरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, गावातील डॉक्टर, मेडिकल दुकानदार, व्यापारी किराणा दुकानदार यांची स्वतंत्र बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे, तसेच जिल्हाधिकारी यांनी सूचित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
यावेळी सरपंच माधुरी प्रभाकर घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, किरण माळी, प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रीना अडसूळ, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अजित गोपुडगे, पोलीसपाटील महंमद पठाण, ग्रामपंचायत सदस्य, समितीचे सर्व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.