कोपार्डे : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी आमदार सतेज पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी संस्था गटातील मतदान एकाच वेळी काेपार्डे (ता. करवीर) येथील मतदान केंद्रावर केले. दोघांनी एकत्रित येत विजयाची खूण दाखविल्यानंतर त्या फोटोसह ‘जसं ठरलंय....तसंच करतोय’ ही श्लोगनने दिवसभर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.‘गोकुळ’च्या राजकारणात चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांना साथ दिली. अरुण नरके हे सत्तेत असताना ‘गोकुळ’ विरोधातील मोर्चात ते पुढे राहिले. त्याची परतफेड म्हणून पाटील यांनी नरके यांना पाठिंबा देत पैरा फेडला.पाटील यांचे संस्था गटातील मतदान करण्यासाठी ते अजित नरके यांच्यासोबत आले. त्यावेळी चंद्रदीप नरके यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासह आमदार प्रा. जयंत आसगावकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, चेतन नरके यांनीही मतदान केले. अरुण नरके मतदान केल्यानंतर विरोधी आघाडीच्या बूथवर काही काळ बसले होते.भानामतीच्या प्रकाराने तणावनिवडणुकीत साम, दाम, दंड या नीतीचा वापर करीत असतानाच भानामतीचे प्रकारही अनेक ठिकाणी आढळून आले. सांगरूळमध्ये भानामती करण्यासाठी आलेल्यास पकडल्याचा व्हिडिओ दिवसभर चर्चेत राहिला.
कुंभी-कासारी कारखाना निवडणूक: जसं ठरलंय... तसंच करतोय, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:18 PM