कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर बेळगावातील ‘कुमुदा शुगर्स’ला २९ वर्षांच्या भाडेकरारावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला. गुरुवारी जिल्हा बँकेत संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ होते. दरम्यान, या निर्णयाला ज्येष्ठ संचालक नरसिंगराव पाटील यांनी विरोध दर्शविला. जिल्हा बँकेच्या ६५ कोटी थकीत कर्जापोटी दौलत कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. जिल्हा बँकेने आतापर्यंत आठवेळा विक्री व भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या; पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. यावेळी आलेल्या निविदेमधील ‘कुमुदा’सह नवजीवन शुगर्स (पुणे), डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह तीन कंपन्यांनी कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, ‘कुमुदा’ने बँकेच्या अटीच्या अधीन राहून कारखाना घेण्यास पुढाकार घेतला. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत कारखाना ‘कुमुदा’ला २९ वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना दहा कोटी रुपये करार करतेवेळी व नंतर पंधरा कोटी असे २५ कोटी विना अट बँक गॅरंटी (पान ८ वर) दौलत कारखाना ‘कुमुदा’सारख्या कंपनीच्या घशात घालण्याला माझा विरोध आहे. बैठकीतही मी विरोध केला आहे. विरोध डावलून ‘कुमुदा’ला कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्यास न्यायालयात जाणार आहे, असेही बैठकीत सांगितले आहे. - नरसिंगराव पाटील, ज्येष्ठ संचालक ‘के . पी.’ - नरसिंगराव यांच्यात खडाजंगी दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयावरून जिल्हा बँकेचे संचालक, माजी आमदार के. पी. पाटील आणि नरसिंगराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा बँकेच्या नुकसानीपोटी आमच्यावर चार ते पाच कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित झाली आहे, असे ‘के. पी.’ म्हणताच ‘ते तुमचेच पाप आहे की!’ असा टोला नरसिंगरावांनी लगावला. - वृत्त ८
‘दौलत’ २९ वर्षांसाठी कुमुदा शुगर्सकडे
By admin | Published: January 01, 2016 12:26 AM