शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्पाच्या नावाखाली कुंटणखाना; कोल्हापुरात चालकासह फ्लॅट मालकावरही गुन्हा; पाच पीडित महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:11 PM

पाच हजारातील फक्त आठशेच पीडित महिलांना

कोल्हापूर : बागल चौकातील इंडिया पार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्लॅमरस फॅमिली स्पामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी बुधवारी (दि. २०) दुपारी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी कुंटणखान्यातून पाच पीडित महिलांची सुटका केली.तसेच स्पा चालक नागेश रमेश बेळेण्णावर (वय ३१, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि फ्लॅट मालक याशीर अब्दुल रशिद बागवान (रा. कदमवाडी, कोल्हापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की, बागल चौक परिसरातील इंडिया पार्क इमारतीमध्ये स्पाच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती. त्यानुसार पंडित यांनी कारवाई करण्याच्या सूचना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला दिल्या. सहायक फौजदार मीनाक्षी पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ग्लॅमरस स्पा येथे छापा टाकला. यावेळी स्पामध्ये कुंटणखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले.पाच हजार रुपयांची रोकड, चार मोबाइल आणि निरोधची पाकिटे असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाच पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक आणि जागा मालकास ताब्यात घेतले. याबाबत मीनाक्षी पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे.पाच हजारातील फक्त आठशेच पीडित महिलांनास्पा चालक नागेश बेळेण्णावर हा ग्राहकांकडून पाच हजार रुपये घेत होता. त्यातील केवळ ८०० रुपये पीडित महिलांना देत होता, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. अशा प्रकारचे अन्य स्पा आणि कॅफेवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी