शहरात मध्यभागी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष जयराम पाटील, उपनगराध्यक्ष गीता बागलकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले, तर बौद्ध समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीमार्फत जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याठिकाणी पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता प्रदीपकुमार बोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी इचलकरंजीचे शहर वाहतूक पोलीस अधिकारी विकास आडसुळ, पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील, नगरसेविका स्नेहल कांबळे, अर्चना ढाले, दीपक कडाळे, अभिनंदन मधाळे, यश कडाळे, धम्मपाल ढाले, रंजना ढाले, अनिकेत गोरे आदी उपस्थित होते.
येथील आदर्श नगरमध्ये पालिकेच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या उद्यानास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत 'भिमाई गार्डन' असे नामकरण करत नगराध्यक्ष पाटील व सुचितोष कडाळे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अक्षय आलासे, फारूक जमादार, दीपक गायकवाड, सुनील चव्हाण, उदय डांगे, जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, दीपक कांबळे, दयानंद मालवेकर, आझम गोलंदाज आदी उपस्थित होते.